अ‍ॅपशहर

'...तर मायावतींविरुद्ध राखी सावंत मैदानात'

उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत बसपा अध्यक्षा मायावती यांच्याविरोधात अभिनेत्री राखी सावंत यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याचे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी जाहीर केले.

Maharashtra Times 14 Nov 2016, 11:52 am
मटा ऑनलाइन वृत्त । अलाहाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rakhi sawant against mayawati up election contests says athawale
'...तर मायावतींविरुद्ध राखी सावंत मैदानात'


उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत बसपा अध्यक्षा मायावती यांच्याविरोधात अभिनेत्री राखी सावंत यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याचे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी जाहीर केले.

आम्ही रालोआचे घटक असल्याने आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक भाजपसोबत युती करुनच लढवणार आहोत. परंतु काही कारणामुळे हे शक्य झाले नाही, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा आपला पक्ष उत्तर प्रदेशच्या ४०३ जागांपैकी २०० जागा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. बसपाच्या अध्यक्षा मायावती या बऱ्याच वर्षापासून विधानसभेची निवडणूक लढवण्याऐवजी विधानपरिषदेतून निवडून जातात. जर मायावती यांनी या निवडणुकीत विधानसभेची निवडणूक लढवली तर त्यांच्याविरोधात अभिनेत्री राखी सावंतला पक्षाकडून निवडणूक मैदानात उतरवणार असल्याचे आठवले म्हणाले.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील दलित समाजाला बसपापासून बदल हवा आहे, आणि त्यासाठी रिपाइं समर्थ पर्याय ठरु शकतो. असेही आठवले यांनी यावेळी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज