अ‍ॅपशहर

Raksha Bandhan 2022 : एक असं गाव जिथे रक्षाबंधनाचा सण साजराच होत नाही, कारण वाचून थक्क व्हाल

Raksha Bandhan Muhurat 2022 : आज म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी देशभरात राखीचा सण साजरा केला जात आहे, परंतु एक असं गाव आहे जिथे हा सण साजरा केला जात नाही. या गावातील मुली रक्षाबंधनाच्या सणाला आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधत नाहीत. तर काळा दिवस म्हणून हा सण साजरा केला जातो.

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Aug 2022, 9:30 am
गाझियाबाद : देशभरात आज बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन साजरा केला जातो. अशात असं एक गाव आहे जिथे रक्षाबंधनाचा सण साजरा होत नाही. रक्षाबंधनाचा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. मात्र, या गावात हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा केला जातो. या गावातील मुली आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधत नाहीत, असे केल्याने अशुभ होते असे मानले जाते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rakshabandhan 2022


खरंतर, रक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या श्रद्धेचा आणि रक्षणाचा सण आहे. नाती म्हणजे अतूट बंध. या दिवशी धार्मिक विधी आणि उत्साहाने पूजा केली जाते. मात्र, उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील मुरादनगर इथे सुराणा गाव आहे. या गावातील लोक हा दिवस अशुभ मानतात. या गावात छाब्रिया गोत्रातील चंद्रवंशी अहिर क्षत्रियांची वस्ती आहे. राजस्थानातील अलवरमधून बाहेर पडल्यानंतर छाब्रिया गोत्रातील अहिरांनी गाव वसवले होते. सुराणा नावापूर्वी हे गाव सोनगड म्हणून ओळखले जात असे.

घरी फडकावलेला ध्वज सायंकाळी उतरवू नका; राष्ट्रध्वज फडकवण्यापूर्वी 'हे' नियम माहिती करुन घ्या

मोहम्मद घोरी गावात नरसंहार झाला

शेकडो वर्षांपूर्वी राजस्थानातून आलेले पृथ्वीराज चौहान यांचे वंशज सोन सिंह हे सुराणा गावात हिंडन नदीच्या काठावर स्थायिक झाले होते. ज्याचा शोध मोहम्मद घोरीने लावला होता. यानंतर मोहम्मद घोरीने रक्षाबंधनाच्या दिवशी संपूर्ण गावातील लोकांवर हत्तींनी हल्ला केला. हत्तींच्या पायाखाली चिरडलेले पाहून संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले. त्या दिवसापासून सुराणा गावातील लोक हा दिवस काळा दिवस म्हणून संबोधतात.

रक्षाबंधन साजरा करताना झाला मृत्यू...

गावातील वडीलधारी मंडळी हा सण साजरा करत नसून ते नव्या पिढीतही परंपरा मोडीत काढून रक्षाबंधन न साजरा करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर एका कुटुंबात कोणाचा मृत्यू झाला आणि दुसऱ्या कुटुंबातील सदस्यांची तब्येत अचानक बिघडू लागली. अशा घटनांनंतर ग्रामस्थांची समजूत घातल्यानंतर रक्षाबंधनाचा सण साजरा करणाऱ्या लोकांनी गावातील कुलदेवतेची माफी मागितली. या दिवशी शाप असल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे रक्षाबंधनाचा सण साजरा करताना अडचणी निर्माण होतात.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख