अ‍ॅपशहर

सतलोक आश्रमच्या बाबा रामपालला जन्मठेप

सतलोक आश्रमाचा प्रमुख बाबा रामपाल व त्याच्या अन्य १५ सहकाऱ्यांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. २०१४ साली आश्रमात झालेल्या हिंसाचारात ५ महिला आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाला होता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Oct 2018, 1:29 pm
हिसार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम satlok


सतलोक आश्रमाचा प्रमुख बाबा रामपाल व त्याच्या अन्य १५ सहकाऱ्यांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. २०१४ साली आश्रमात झालेल्या हिंसाचारात ५ महिला आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाला होता.

हिसारचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी. आर. चालिया यांनी या हत्येप्रकरणी रामपाल व त्याच्या २६ भक्तांना दोषी ठरवले होते. कोर्टाने आज १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. गेल्या चार वर्षापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. रामपालच्या आश्रमात दोन व्यक्तींच्या पत्नींना कैद केले व त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली असे दिल्लीच्या बदरपूर आणि उत्तर प्रदेशातील ललितपूरमधील दोन व्यक्तींनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पतीच्या तक्रारीवरुन पोलीस रामपालच्या चौकशीसाठी आश्रमात येणार याची माहिती मिळताच रामपालच्या १५ हजार भक्तांनी सतलोक आश्रमाला घेराव घातला होता.

रामपाल यांना अटक करण्यात येऊ नये यासाठी त्याच्या भक्तांनी सतलोक आश्रमात जाळपोळ, हिंसाचार केला. या हिंसाचारात पाच महिला आणि एका लहान मुलाचा मृत्या झाला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज