अ‍ॅपशहर

जपानच्या योगा निकेतनला 'पंतप्रधान योग पुरस्कार'

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी पंतप्रधान योग पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली आहेत. योगामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या दोन संस्थांना हा पुरस्कार दिला जाणार असून यासोबतच अन्य दोन पुरस्काराची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jun 2019, 3:50 pm
नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yog

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी पंतप्रधान योग पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली आहेत. योगामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या दोन संस्थांना हा पुरस्कार दिला जाणार असून यासोबतच अन्य दोन पुरस्काराची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे.

या पुरस्कारात गुजरातमधील स्वामी राजश्री मुनी-लाइफ मिशन (वैयक्तिक, राष्ट्रीय पुरस्कार), अँथोनीता रोजी, इटली (वैयक्तिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार), बिहार स्कूल ऑफ योगा-मुंगेर (संस्था-राष्ट्रीय पुरस्कार) तर जपानच्या योगा निकेतनला आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या सर्व विजेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रत्येकी २५-२५ लाख रुपये आणि प्रशस्ती पत्राने गौरविले जाणार आहे.

पंतप्रधान योग पुरस्काराची सुरुवात २०१७ मध्ये झाली आहे. यावर्षी या पुरस्कारासाठी एकूण ७९ अर्ज आले होते. पुरस्काराची निवड करण्यासाठी दोन समित्याची नेमणूक करण्यात आली होती. अँथोनीता रोजी या इटलीतील योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. गेल्या ४२ वर्षापासून त्या योगशी निगडीत आहेत. जपानची योगा निकेतन ही संस्था १९८० पासून कार्यरत असून ती बेंगळुरूच्या एस व्यास योगा विद्यापीठासोबत एकत्र काम करतेय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज