अ‍ॅपशहर

संमोहित करून महिलेवर बलात्कार

हरियाणातील फरिदाबाद शहरात एका कीर्तनकाराने महिलेला संमोहित करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेने सेक्टर १६ येथील पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला आहे.

Maharashtra Times 23 Mar 2017, 3:04 pm
मटा ऑनलाइन वृत्त । फरीदाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rape after hypnotising woman
संमोहित करून महिलेवर बलात्कार


हरियाणातील फरिदाबाद शहरात एका कीर्तनकाराने महिलेला संमोहित करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेने सेक्टर १६ येथील पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय पीडित महिला पती व दोन मुलांसह राहते. सुमारे ८ महिन्यांपूर्वी पीडितेने आरोपी कीर्तनकाराला बोलावून घरी भागवत कथेचे आयोजन केले होते. त्यानंतर त्या कीर्तनकार महिलेच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. गेल्या वर्षी १३ डिसेंबर रोजी आरोपी रात्रीच्या सुमारास पीडित महिलेच्या घरी गेला. थोडा वेळ गप्पा-गोष्टी केल्यानंतर त्याने त्या महिलेच्या कपाळावर टीका लावून तिला संमोहित केले. त्याचदरम्यान त्याने पीडितेच्या पतीला घराबाहेर पाठवले आणि महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणाची कुठेही वाच्यता केल्यास तिचा पती व मुलांना जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली. त्यानंतर अनेक वेळा आरोपीने महिलेच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला.

एवढंच नव्हे तर त्याने महिलेच्या पतीला घराबाहेर हाकलले आणि तो तिच्या घरात ठाण मांडून बसला. दारूच्या नशेत तो तिच्यावर सतत अत्याचार करत असे. तिचे दागिने आणि पैसेही त्याने हडपले. त्याच्या भीतीने पीडितेने सर्व नातेवाईकांशी संबंध तोडले, मात्र तरीही त्याचे कुकर्म सुरूच राहिले.

या सर्व अत्याचाराला वैतागलेल्या महिलेने अखेर एक दिवस हिंमत दाखवरत आरोपीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिस फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज