अ‍ॅपशहर

नीता अंबानी-ऊर्जित पटेल यांचं 'हे' नातं खोटं

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची पत्नी ही रिलायन्सच्या मालकीणबाई नीता अंबानी यांची बहीण आहे, पर्यायाने मुकेश अंबानी आणि ऊर्जित पटेल हे एकमेकांचे साडू आहेत, ही सोशल मिडियावरील चर्चा म्हणजे निव्वळ अफवा आहे, त्यात काहीही तथ्य नाही.

Maharashtra Times 22 Nov 2016, 10:48 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rbi governor urjit patels wife is not nita ambanis sister
नीता अंबानी-ऊर्जित पटेल यांचं 'हे' नातं खोटं


रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची पत्नी ही रिलायन्सच्या मालकीणबाई नीता अंबानी यांची बहीण आहे, पर्यायाने मुकेश अंबानी आणि ऊर्जित पटेल हे एकमेकांचे साडू आहेत, ही सोशल मिडियावरील चर्चा म्हणजे निव्वळ अफवा आहे, त्यात काहीही तथ्य नाही.

नीता अंबानी यांना फक्त एक सख्खी बहीण असून तिचं नाव ममता दलाल आहे. जुलै २०१४ मध्ये त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं आणि सध्या ममता या अंबानींच्या शाळेतच शिक्षिका म्हणून काम करतात. तर, ऊर्जित पटेल यांच्या पत्नीचं नाव कानन असं असून त्या अनिल आर. पटेल यांच्या कन्या आहेत. त्यांचा नीता अंबानींशी कुठलाही संबंध नाही.



नोटाबंदीच्या निर्णयानंतर सगळीकडेच उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. मोदींच्या निर्णयाचे समर्थक आणि विरोधक यांच्यात जोरदार वाक् युद्ध रंगतंय. नोटाबंदीचा निर्णय मुकेश अंबानी आणि अदानी यांना आधीच माहीत होता, असा आरोप मोदीविरोधक करताहेत. अशातच, नीता अंबानी आणि ऊर्जित पटेल यांची पत्नी कानन या बहिणी असल्याची एक पोस्ट सोशल मिडियावरील व्हायरल झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. या पोस्टची शहानिशा केली असता, ती निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट झालंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज