अ‍ॅपशहर

मला फोनवरून धमकावले जात आहे: खरगे

गेल्या काही महिन्यापासून मला धमकीचे फोन येत असून त्याची तक्रार लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना करण्यात आल्याचं लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी सांगितलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Mar 2018, 11:32 am
बंगळुरू: गेल्या काही महिन्यापासून मला धमकीचे फोन येत असून त्याची तक्रार लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना करण्यात आल्याचं लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम receiving threat calls congress leader mallikarjun kharge
मला फोनवरून धमकावले जात आहे: खरगे


कलबुर्गी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मल्लिकार्जून खरगे यांनी ही माहिती दिली. याप्रकरणी दिल्लीतील तुघलक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र कोणत्या प्रकारच्या धमक्या येत आहेत हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

'मला शांत करून मला रोखता येईल, असं काही लोकांना वाटत आहे. जेव्हा मी सहा वर्षाचा होतो. तेव्हा माझ्या घराला आग लागली होती. त्यात माझे आई-वडील आणि नातेवाईकांचा मृत्यू झाला होता. तेव्हाच माझा मृत्यू झाला असता हे धमकावणाऱ्यांना माहित नाही. आता मी ७६ वर्षाचा असून हे ७० वर्ष माझ्यासाठी बोनस असल्याचं मी मानतो,' असं त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज