अ‍ॅपशहर

Narendra Modi Stadium : 'फक्त स्टेडियमला मोदींचे नाव, क्रीडा नगरीला सरदार पटेलांचे नाव कायम'

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमचे नाव बदलू नरेंद्र मोदी असे करण्यात आल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारसह भाजपवर हल्लाबोल केला. यावर अखेर केंद्र सरकारने स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी असे करण्यात आले आहे. पण संपूर्ण क्रीडा परिसराचे नाव सरदार पटेल असे कायम राहणार आहे, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Feb 2021, 8:49 am
नवी दिल्लीः अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमचे नाव बदलण्यात आल्याने निर्माण झालेल्या वादावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. फक्त स्टेडियमचे नाव बदलण्यात आले आहे. पण संपूर्ण क्रीडा परिसराचे नाव सरदार पटेल असेच राहणार आहे, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन केलं. या क्रिकेट स्टेडियमचे नाव नेरंद्र मोदी स्टेडियम असे ( narendra modi stadium ) ठेवण्यात आले आहे. हे स्टेडियम आधी मोटेरा स्टेडियम नावाने ओळखले जात होते. स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी असे करण्यात आल्याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या. तसंच विरोधी पक्षांनीही टीका केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Narendra Modi Stadium
'फक्त स्टेडियमला मोदींचे नाव, क्रीडा नगरीला सरदार पटेलांचे नाव कायम'


सरदार वल्लभभाई पटेल यांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केला आहे. यावर माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्टीकरण दिलं. फक्त स्टेडियमचे नाव बदलण्यात आले आहे. पण संपूर्ण क्रीडा परिसराचे नाव सरदार वल्लभभाई पटेल असे कायम राहणार आहे, असं जावडेकर म्हणाले. तर टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पलटवार केला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी गुजरातमधील केवडिया येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचा जागतील सर्वांत उंच पुतळा उभारल्यानंतर कधी त्याचं कौतुक केलं का?, असा सवाल रविशंकर प्रसाद यांनी केला. तर आतापर्यंत ना सोनिया गांधी ना राहुल गांधी केवडियाला गेले, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.

राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांची टीका

मोटेरा स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 'सुंदर, सत्य हे स्वतःहूनच समोर आले. नरेंद्र मोदी स्टेडियम, अदानी एंड, रिलायन्स एंड. जय शहा हे अध्यक्ष आहेत. हम दो हमारे दो' ( #HumDoHumareDo ) या हॅशटॅगसह त्यांनी ट्विट करत टीका केली. कॉंग्रेस नेते राहुल गांधी कृषी कायद्यांवरूनही हम दो, हमारे दो अशी घोषणा देत पंतप्रधान मोदींना लक्ष्य केल होतं.

'उत्तर-दक्षिण' वक्तव्यावरून राहुल गांधी वादात; कपिल सिब्बलांनी दिला सल्ला, म्हणाले...

भाजप कधी गेमचेंजर असून शकत नाही. कारण भाजप फक्त नेमचेंजर आहे, यात काही शंका नाही, असं ट्वीट करत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर निशाणा साधला. मोटेरा स्टेडियमला असलेले सरदार पटेलांचे नाव बदलून त्या नरेंद्र मोदींचं नाव देणं लाजीरवाणं आहे. हे अपमानजनक आहे, असं कॉंग्रेस खासदार राजीव सातव म्हणाले.

pm modi : PM मोदी म्हणाले, 'व्यवसाय करणं सरकारचं काम नाही...'
हा भारतीय संस्कृती आणि सरदार पटेलांचा अपमान आहे, असं कॉंग्रेस नेते अर्जुन मोधवाडिया म्हणाले. १९८० चे हे स्टेडियम पुन्हा बांधण्यात आले आहे. पण लोकशाहीमध्ये जिवंत माणसाच्या स्मृतीत इमारत बांधण्याची परंपरा नाही. भाजपला हे अतिशय महाग पडेल, असं मोधवाडिया म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज