अ‍ॅपशहर

वन रँक वन पेन्शन: पुन्हा रण पेटले

केंद्रातील मोदी सरकारने जाहीर केलेल्या वन रँक वन पेंशन योजनेची (ओआरओपी) अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ लष्करातील निवृत्त सुभेदार रामकिशन ग्रेवाल यांनी मंगळवारी विष प्राशन करून आत्महत्या केल्यानंतर बुधवारी दिल्लीमध्ये राजकीय संघर्ष उफाळला.

Maharashtra Times 3 Nov 2016, 3:09 am
निवृत्त जवानाच्या आत्महत्येनंतर राजकीय रणधुमाळी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम retired armyman commits suicide over orop rahul gandhi flays pm modi
वन रँक वन पेन्शन: पुन्हा रण पेटले


म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

केंद्रातील मोदी सरकारने जाहीर केलेल्या वन रँक वन पेंशन योजनेची (ओआरओपी) अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ लष्करातील निवृत्त सुभेदार रामकिशन ग्रेवाल यांनी मंगळवारी विष प्राशन करून आत्महत्या केल्यानंतर बुधवारी दिल्लीमध्ये राजकीय संघर्ष उफाळला. मृत ग्रेवाल यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्ली पोलिसांनी मज्जाव केल्यामुळे वातावरण कमालीचे तापले.

राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेऊन नवी दिल्लीतील विविध पोल‌सि ठाण्यांमध्ये हलविण्यात आले. दुसरीकडे मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्यासह सत्ताधारी आम आदमी पार्टीच्या प्रमुख नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आल्यामुळे एकाचवेळी काँग्रेस आणि आपचे समर्थक मोठ्या संख्येने मोदी सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरल्याने नवी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिघळली.

लष्कर आणि लष्कराशी संबंधित सेवांमध्ये आपण ३० वर्षे ९ महिने २६ दिवस नोकरी करुनही सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार वेतनभत्ते तसेच ओआरओपीचे वाढीव लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ हरयाणातील निवृत्त सुभेदार रामकिशन ग्रेवाल यांनी मंगळवारी रात्री संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना निवेदन देण्यासाठी जात असताना रस्त्यातच विष प्राशन करून आत्महत्या केली. सुभेदार ग्रेवाल यांना तातडीने राम मनोहर लोहिया रुग्णालयात हलविण्यात आले. पण तिथे त्यांचे निधन झाले.

मी माझ्या मातृभूमीसाठी आणि माझ्या देशाच्या वीर जवानांसाठी माझे प्राण देत आहे.

- चिठ्ठीतील व्यथा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज