नवी दिल्ली, वृत्तसंस्था
केंद्रीय अन्वेषण विभागाचे हंगामी संचालक म्हणून एम. नागेश्वर राव यांची नियुक्ती करण्याच्या सरकारच्या आदेशाविरोधातील खटल्यातून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी माघार घेतली आहे. नव्या संचालकांच्या नियुक्तीसाठी उच्चाधिकार निवड समितीची २४ जानेवारीला बैठक होणार आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांच्यासह गोगोईही सदस्य आहेत. त्यामुळेच गोगोई यांनी हा निर्णय घेतला आहे.