अ‍ॅपशहर

Robert Vadra: मनी लाँड्रिंग: रॉबर्ट वाड्रा ईडीच्या कार्यालयात दाखल

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा मनी लाँड्रिंग प्रकरणातील चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. वाड्रा यांच्या चौकशीची दुसरी फेरी आज होत आहे आहे. वाड्रा यांचे वकील ईडीच्या कार्यालयात अगोदरच पोहोचले होते. ईडीने काल (बुधवार) वाड्रा यांची सुमारे तास चौकशी केली होती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Feb 2019, 12:24 pm
नवी दिल्ली

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा मनी लाँड्रिंग प्रकरणातील चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. वाड्रा यांच्या चौकशीची दुसरी फेरी आज होत आहे. वाड्रा यांचे वकील ईडीच्या कार्यालयात अगोदरच पोहोचले होते. ईडीने काल (बुधवार) वाड्रा यांची सुमारे ६ तास चौकशी केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, वाड्रा यांच्याकडे त्यांच्या लंडनमधील मालमत्तेबाबत माहिती विचारण्यात आली. शिवाय, संजय भंडारी नावाच्या एका उद्योजकाबाबतही त्यांना विचारणा करण्यात आली. ईडीने वाड्रा यांच्याकडे काही ई-मेलबाबतही माहिती मागितली होती.

दिल्लीच्या एका कोर्टाने वाड्रा यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र, वाड्रा यांनी चौकशीत पूर्ण सहकार्य केले पाहिजे असे स्पष्ट निर्देशही कोर्टाने दिले होते. प्रियांका गांधी यांनी बुधवारी औपचारिकपणे पक्षाच्या महासचिव पदाची जबाबदारी स्वीकारली. तत्पूर्वी, त्यांनी पती वाड्रा यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात सोडले. आतापर्यंत काँग्रेसने या प्रकरणापासून चार हात दूर राहणे पसंत केले होते. आता मात्र, काँग्रेस वाड्रा यांच्या चौकशीनिमित्त भाजप बदला घेण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप लावू शकते असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

पतीच्या बाजूने उभ्या राहिल्या प्रियांका गांधी

नुकताच राजकारणात अधिकृत प्रवेश केलेल्या प्रियांका गांधी यांनी वाड्रा यांना ईडीच्या कार्यालयात सोडण्याबरोबरच आपण पती आणि कुटुंबीयांसोबत आहोत असे स्पष्ट केले आहे. शिवाय या प्रकरणावर बोलताना त्यांनी आता कांग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष होणार याचे संकेतही दिले आहेत.

काँग्रेस वाड्रांबाबतचे प्रश्न नेहमीच टाळत आला, भाजपने घेतला फायदा

वाड्रा हे एक सामान्य नागरिक असून त्यांचा काँग्रेस पक्षाशी अधिकृत संबंध नाही असे काँग्रेस सतत सांगत आला आहे. याचा फायदा घेत भाजपने २०१४च्या लोकसभा निवडणुकीत वाड्रा यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला. यानंतर हा राजकीय बदला घेण्याचा प्रकार असल्याचे सांगत काँग्रेसने वाड्रा यांचे समर्थन करणे सुरू केले. त्यानंतर परिस्थिती बदलली. प्रियांका गांधी यांनी अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. त्यानंतर वाड्रा यांच्याशी काँग्रेस पक्षाची जवळीक अधिक वाढली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज