अ‍ॅपशहर

रोहित तिवारी यांचा गळा घोटल्याने मृत्यू

उत्तराखंडचे दिवंगत माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे पुत्र रोहितशेखर तिवारी यांचा गळा दाबल्याने श्वास कोंडून मृत्यू झाला, असे शवविच्छेदन अहवालातून समोर आले.

MT 20 Apr 2019, 4:00 am
नवी दिल्ली : उत्तराखंडचे दिवंगत माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे पुत्र रोहितशेखर तिवारी यांचा गळा दाबल्याने श्वास कोंडून मृत्यू झाला, असे शवविच्छेदन अहवालातून समोर आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rohit-tiwari


एम्स रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी खूनाचा दावा दाखल करून हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) पुढील चौकशीसाठी हस्तांतरित करण्यात आले आहे. पाच वरिष्ठ डॉक्टरांकडून शवविच्छेदन करण्यात आले. रोहितशेखर तिवारी यांचा गळा दाबल्याने श्वास कोंडून मृत्यू झाल्याचा अहवाल त्यांनी दिला. त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला होता. दरम्यान, त्यांच्या आई उज्ज्वला तिवारी यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहित तिवारी यांनी २०१७मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज