अ‍ॅपशहर

PM मोदींच्या विदेश दौऱ्यांवर ४४६ कोटी खर्च

'पं​तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर गेल्या पाच वर्षांमध्ये ४४६ कोटी ५२ लाख रुपये खर्च झाला आहे,' अशी माहिती परराष्ट्र खात्याने बुधवारी दिली. लोकसभेमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ही माहिती दिली. या खर्चामध्य़े खासगी विमानांवरील खर्चाचाही

महाराष्ट्र टाइम्स 5 Mar 2020, 6:27 am
नवी दिल्ली : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर गेल्या पाच वर्षांमध्ये ४४६ कोटी ५२ लाख रुपये खर्च झाला आहे,' अशी माहिती परराष्ट्र खात्याने बुधवारी दिली. लोकसभेमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ही माहिती दिली. या खर्चामध्य़े खासगी विमानांवरील खर्चाचाही
महाराष्ट्र टाइम्स.कॉम narendramodi


समावेश आहे. मुरलीधरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५-१६ या कालावधीत परदेश दौऱ्यांवर १२१ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. तर पुढील वर्षी अर्थात, २०१६-१७मध्ये ७८ कोटी ५२ लाख रुपये परदेश दौऱ्यांवर खर्च झालेले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यांवर २०१७-१८ या वर्षी ९९ कोटी ९० लाख रुपयांचा खर्च झाला आहे, तर २०१८-१९ या कालवधीत खर्चाचा आकडा १०० कोटी दोन हजार रुपयांवर गेला आहे. घुसखोरीच्या घटनांमध्ये घट ईशान्य भारतातील घुसखोरीच्या घटनांमध्ये गेल्या सहा वर्षांमध्ये ७० टक्के घट झाली असून, नागरिकांचा बळी जाण्याच्या घटनाही ८० टक्क्यांनी घटल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रे्ड्डी यांनी बुधवारी राज्यसभेत दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज