अ‍ॅपशहर

IAS अधिकाऱ्याच्या घरात ८०० कोटींचं घबाड

प्रशासनातील मोक्याच्या पदाचा फायदा घेऊन संपत्ती कमावण्याची उदाहरणं आपल्याकडं नवी नाहीत. पण, असा गैरकारभार करणाऱ्यांनाही लाजवेल असा प्रताप आंध्रातील आयएएस अधिकारी ए. मोहन यानं केला आहे. मोहन याच्या घरातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तब्बल ८०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. त्यात अनेक महागडे हिरे व दागिन्यांचा समावेश आहे.

Maharashtra Times 30 Apr 2016, 6:43 pm
मटा ऑनलाइन वृत्त । हैदराबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rs 800 crores seized in raid at ias officers residence
IAS अधिकाऱ्याच्या घरात ८०० कोटींचं घबाड

प्रशासनातील मोक्याच्या पदाचा फायदा घेऊन संपत्ती कमावण्याची उदाहरणं आपल्याकडं नवी नाहीत. पण, असा गैरकारभार करणाऱ्यांनाही लाजवेल असा प्रताप आंध्रातील आयएएस अधिकारी ए. मोहन यानं केला आहे. मोहन याच्या घरातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तब्बल ८०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. त्यात अनेक महागडे हिरे व दागिन्यांचा समावेश आहे.

मोहन हा आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी येथील परिवहन विभागाचा उपायुक्त आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी मोहन याच्या तेलंगण, आंध्र व कर्नाटक येथील घरावर छापे टाकून ८०० कोटींची बेकायदा संपत्ती जप्त केली. छाप्यानंतर त्याला अटकही करण्यात आली आहे. एसीबीच्या केंद्रीय पथकाचे उपअधीक्षक ए. रामादेवी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. मोहन याची खाती असलेल्या १२ बँकांतील लॉकरची तपासणी अद्याप झालेली नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

काळा पैसा पांढरा करण्यासाठी मोहन यानं स्वत:च्या मुलीच्या नावानं आठ कंपन्या सुरू केल्या होत्या. अलीकडंच त्यानं आपली काही संपत्ती सासू-सासऱ्याच्या नावावर केली होती. छापा टाकण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना घरात घुसण्यास त्यानं विरोध केला. अधिकारी घरात येताच त्यानं स्वत:चा मोबाइल घराबाहेर फेकून दिला. नंतर तो अधिकाऱ्यांच्या हाती लागला. या मोबाइलमधील कॉल व मेसेजची तपासणी सुरू असून त्यातून बरंच काही हाती लागण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज