अ‍ॅपशहर

रा. स्व. संघ भाजपचा दूत नाही!: भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टीचा आणि केंद्र सरकारचा दूत म्हणून काम करत नाही. शिक्षकांना आपल्या अडचणी मांडायच्या असतील तर त्यांनी थेट केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहावे, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले. भागवत आग्रा (उत्तर प्रदेश) येथे शिक्षकांच्या संमेलनात सहभागी झाले होते.

Maharashtra Times 21 Aug 2016, 10:44 pm
मटा ऑनलाइन वृत्त । आग्रा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rss chief bhagwat says he is not a governments messenger
रा. स्व. संघ भाजपचा दूत नाही!: भागवत


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टीचा आणि केंद्र सरकारचा दूत म्हणून काम करत नाही. शिक्षकांना आपल्या अडचणी मांडायच्या असतील तर त्यांनी थेट केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहावे, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले. भागवत आग्रा (उत्तर प्रदेश) येथे शिक्षकांच्या संमेलनात सहभागी झाले होते.

उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आलेल्या भागवतांनी शिक्षक संमेलनात शिक्षकांशी संवाद साधला. या संमेलनासाठी उत्तर प्रदेशच्या ११ जिल्ह्यांतून कॉलेज आणि विद्यापीठ स्तरावर शिकवणारे शिक्षक सहभागी झाले होते. या प्रसंगी शिक्षकांशी संवाद साधताना आपण हा विषय जावडेकरांना कळवू पण शिक्षकांनी थेट पत्र लिहून हा मुद्दा मांडावा असे भागवतांनी सांगितले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही भागवतांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक स्वतंत्र संघटना आहे. लोकांना संघटित करणे, देशहितासाठी काम करण्याकरिता नागरिकांना प्रोत्साहित करणे यासाठी संघ काम करतो. संघ सरकारचा दूत नाही. त्यामुळे लोकांनी आपल्या अडचणी थेट सरकारला सांगाव्या. मी प्रत्येक मुद्दयावर सरकारशी बोलू शकत नाही, असे भागवतांनी सांगितले.

दुसऱ्या एका कार्यक्रमात २ हजार तरुण जोडप्यांशी भागवतांनी संवाद साधला. कौटुंबिक संस्कार जपण्यासाठी आणि मुलांमध्ये देशभक्ती जागवण्यासाठी सर्व पालकांनी जागरुकपणे प्रयत्न करायला हवेत, असे भागवत म्हणाले.

हिंदू धर्मियांच्या लोकसंख्येत घट होत असताना, इतर धर्मियांच्या लोकसंख्येत वाढ होत आहे. या बदलामागचे मुख्य कारण बदलेल्या सामाजिक वातावरणात आहे. या परिस्थितीत आपण काय करायचे याचा निर्णय प्रत्येकाने विचारपूर्वक घ्यावा, असे भागवत म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज