अ‍ॅपशहर

...पण गोरक्षण झालेच पाहिजे: मोहन भागवत

गोरक्षण झाले पाहिजे मात्र, त्यासाठी होणारा हिंसाचार चुकीचा असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. संपूर्ण देशभरात गो-हत्या रोखण्यासाठी कायद्याची आवश्यकता असल्याचे मत ही भागवत यांनी व्यक्त केले.

Maharashtra Times 10 Apr 2017, 3:26 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rss chief mohan bhagwat condemns violence by cow protection groups
...पण गोरक्षण झालेच पाहिजे: मोहन भागवत


गोरक्षण झाले पाहिजे मात्र, त्यासाठी होणारा हिंसाचार चुकीचा असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. संपूर्ण देशभरात गो-हत्या रोखण्यासाठी कायद्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ही भागवत यांनी केले.

राजस्थानमधील अलवरमध्ये काही गोरक्षकांनी एका अल्पसंख्यांक व्यक्तीला मारहाण करत हत्या केली होती. या घटनेनंतर भाजप आणि संघावर देशभरातून टीकेची झोड उठवण्यात आली होती. महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सरसंघचालकांनी गो-रक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या हिंसेचा विरोध केला. गोरक्षकांकडून होत असलेल्या हिंसेमुळे इतरांच्या प्रयत्नांवर पाणी फिरवले जात आहे. अनेक राज्यांमध्ये संघाची पार्श्वभूमी असलेले लोक सत्तेवर आहेत. त्याठिकाणी गो-रक्षणासाठी कायदे बनवण्यात आले आहेत. गो-रक्षणाचे काम हिंसेमुळे बदनाम होत असल्याचे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले. गो-रक्षणाचे काम कायद्याच्या चौकटीत झाले पाहिजे असेही मोहन भागवत यांनी म्हटंले. बीफ खाणाऱ्या राज्यांमध्ये ईशान्य भारत, केरळसारख्या राज्यांचा समावेश होतो. मात्र, याठिकाणी बीफ बंदीवर भाजप नरमाईची भूमिका घेते. त्यामुळे भाजपचे गाय आणि गोवंश प्रेम बेगडी असल्याचे मत विरोधकांनी व्यक्त केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज