अ‍ॅपशहर

RSSची नोंदणीच झालेली नाही!: दिग्विजय

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदक्षिणेच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात देणग्या मिळतात. या देणग्यांची कुठंही नोंद होत नाही,' असा आरोप करतानाच, 'हा पैसा कुठे खर्च केला जातो, याचा खुलासा संघानं करायला हवा,' अशी मागणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे.

Maharashtra Times 24 Jul 2016, 11:03 am
मटा ऑनलाइन वृत्त । पणजी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rss is an unregistered organisation says digvijay singh
RSSची नोंदणीच झालेली नाही!: दिग्विजय

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदक्षिणेच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात देणग्या मिळतात. या देणग्यांची कुठंही नोंद होत नाही,' असा आरोप करतानाच, 'हा पैसा कुठे खर्च केला जातो, याचा खुलासा संघानं करायला हवा,' अशी मागणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे.

पणजी येथे झालेल्या पक्षाच्या एका बैठकीनंतर दिग्विजय पत्रकारांशी बोलत होते. 'सरकारदरबारी आरएसएसची नोंदणीच झालेली नाही,' असा दावा दिग्विजय यांनी यावेळी केला. 'ज्या संघटनेची नोंदणीच झालेली नाही, तिच्यावर बंदी कशी आणता येणार?,' असा प्रतिसवाल दिग्विजय यांनी केला. 'आरएसएसला गुरुपौर्णिमेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात देणग्या मिळतात. त्याचा कुठेही हिशेब ठेवला जात नाही. आरएसएस नोंदणीकृत संघटना नसल्यानं ती कोणत्याही कायद्याच्या कक्षेत येत नाही. त्यामुळं त्यांना मिळणारा पैसा कुठे जातो, याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं. तसंच, देणग्यांचा आकडा जाहीर करायला हवा,' असं दिग्विजय म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज