अ‍ॅपशहर

संघ कार्यकर्त्याची हत्या, केरळ बंद

तिरूवनंतपूरममध्ये झालेल्या राजकीय हिंसाचारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. त्यामुळे केरळमध्ये तणाव निर्माण झाला असून या हत्येच्या निषेधार्थ केरळमध्ये आज कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे.

Maharashtra Times 30 Jul 2017, 11:16 am
मटा ऑनलाइन वृत्त । तिरूवनंतपूरम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rss worker dies in kerala bjp calls for state wide strike
संघ कार्यकर्त्याची हत्या, केरळ बंद


तिरूवनंतपूरममध्ये झालेल्या राजकीय हिंसाचारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. त्यामुळे केरळमध्ये तणाव निर्माण झाला असून या हत्येच्या निषेधार्थ केरळमध्ये आज कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे.

शनिवारी रात्री ९ वाजता ही घटना घडली. संघाचा कार्यकर्ता असलेला राजेश रात्री दुकानातून बाहेर पडत असताना गाडीतून आलेल्या २० लोकांच्या एका गटाने त्याच्यावर हल्ला केला. त्याला हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली आणि त्याचा हात तोडला. या हल्ल्यानंतर तो २० मिनिटे रस्त्यावर तसाच तडफडत होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शनिवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. सीपीएमच्या कार्यकर्त्यांनीच हा हल्ला केल्याचा आरोप संघाने केला आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

एका गटाने हा हल्ला केला असून त्यात सीपीएमचा एक कार्यकर्ता होता, असं पोलीस निरिक्षक मनोज अब्राहम यांनी सांगितलं. आरोपी आणि राजेश यांच्यात दुश्मनी होती. त्या वादातून ही हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. दरम्यान, या हत्येमागे राजकीय शक्ती आहेत का? याची चौकशी करण्यात येत असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज