अ‍ॅपशहर

धर्मांतर रोखण्यासाठी दलित वस्त्यांजवळ आश्रम

उत्तर प्रदेशात होत असलेलं धर्मांतर रोखण्यासाठी विश्व हिंदू परिषद सरसावली असून त्यासाठी त्यांनी दलित वस्त्यांजवळ आश्रम उघडण्याचं ठरवलं आहे. ज्या-ज्या ठिकाणी जातीभेद होत असेल त्या-त्या ठिकाणी सामूहिक विधीचे कार्यक्रम करुन अस्पृश्यता मिटवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Maharashtra Times 18 Oct 2016, 1:24 pm
मटा ऑनलाइन वृत्त । कानपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम saints will start ashram to stop conversion
धर्मांतर रोखण्यासाठी दलित वस्त्यांजवळ आश्रम


उत्तर प्रदेशात होत असलेलं धर्मांतर रोखण्यासाठी विश्व हिंदू परिषद सरसावली असून त्यासाठी त्यांनी दलित वस्त्यांजवळ आश्रम उघडण्याचं ठरवलं आहे. ज्या-ज्या ठिकाणी जातीभेद होत असेल त्या-त्या ठिकाणी सामूहिक विधीचे कार्यक्रम करुन अस्पृश्यता मिटवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कानपूरमधील पनकी येथे सोमवारपासून सुरू झालेल्या आखिल भारतीय युवा संत चिंतन शिबिरात देश-विदेशातील संतानी सहभाग घेतलाय. धर्मांतर केलेल्या लोकांना त्यांच्या पूर्वजांची आठवण करुन देत त्यांच्या 'घरवापसी' साठी प्रयत्न करण्यात येणार आहे. जबरदस्तीचे धर्मांतर, घुसखोरी, लव्ह जिहाद, मुस्लिम बहुविवाह पद्धतीमुळं वाढणारी लोकसंख्या, लोकसंख्यावाढीमुळं बिघडलेलं सामाजिक संतुलन यासारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय मंत्री अशोक तिवारी यांनी दिली. देशात अनेक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यात येत असल्यानं साधू-संतांनी स्वतः दलित वस्त्यांमध्ये जाऊन सामूहिक विधीचे कार्यक्रम पार पाडावे. समाजात कोणीही अस्पृश्य राहता कामा नये. सर्वजण हे देवाचा अंश आहे, असंही यावेळी सांगण्यात आलं.

अज्ञान, पैशांचं आमिष, भीती आणि दहशतवाद या सर्वांमुळं धर्मांतर होत आहे. अस्पृश्यता हे यातील सर्वात मुख्य कारण आहे. समाजातील अज्ञान आणि भीती दूर करणं गरजेचं असल्याचं एकमतानं सांगण्यात आलं. हे सर्व करण्यांसाठी दलित वस्त्यांजवळ संताचे आश्रम उघडले गेले पाहिजे. ज्या लोकांनी धर्मांतर केले आहे अशा लोकांना त्यांच्या पूर्वजांची आठवण करुन देत त्यांची घरवापसी करायला हवी, असा सूर या शिबिरात पहिल्या दिवशी संतांनी आळवला.

दरम्यान, ट्रिपल तलाकच्या प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. तलाकबद्दल हिंदुतील मुलींमध्ये जागृती करायला हवी. तरच त्या 'लव्ह जिहाद' मध्ये अडकणार नाहीत. दलित मुलांच्या जेवणाचा आणि शिक्षणाचा खर्च केल्यास धर्मांतर रोखता येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज