अ‍ॅपशहर

sajjan kumar : सज्जन कुमार यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

शीखविरोधी दंगलीप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यानंतर काँग्रेस नेते सज्जन कुमार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून सज्जन कुमार यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Dec 2018, 1:14 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sajjan-kumar1

शीखविरोधी दंगलीप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यानंतर काँग्रेस नेते सज्जन कुमार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून सज्जन कुमार यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

सज्जन कुमार यांनी आज राहुल गांधी यांना पत्र लिहिलं असून दिल्ली उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी या चिठ्ठीत म्हटलं आहे. शीखविरोधी दंगली प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने ३० एप्रिल २०१३ रोजी सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता केली होती. कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला सीबीआयने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सोमवारी निर्णय देताना दिल्ली उच्च न्यायालयाने सज्जन कुमार यांच्यासह आणखी तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर या दंगलीतील दोन दोषींना प्रत्येकी दहा वर्षाची शिक्षा ठोठावली होती. येत्या ३१ डिसेंबरपूर्वीच सज्जन कुमार यांना शरणागती पत्करावी लागणार असल्याने त्यापूर्वीच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज