वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सन १९८४च्या शीखविरोधी दंगलीतील सहभागावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेला माजी काँग्रेस नेता सज्जन कुमार सोमवारी न्यायालयात शरण आला. सुरक्षाव्यवस्था अधिक असलेल्या तिहार तुरुंगात आपल्याला ठेवावे, अशी याचिका त्याने केली होती. न्यायालयाने त्याची ही याचिका फेटाळली. मात्र, सुरक्षेची मागणी मान्य करून वेगळ्या वाहनाने त्याला दिल्लीतील मंडोली येथील तुरुंगात नेण्यात आले.
शीखविरोधी दंगलींसंदर्भात आणखी एका प्रकरणात सज्जन कुमारची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे त्याच्या जिवाला धोका होता. म्हणून न्यायालयाने त्याच्या सुरक्षेची मागणी मान्य केली, अशी माहिती वकिलांनी दिली. नियमाप्रमाणे मात्र तिहार तुरुंगासाठी त्याने केलेली मागणी फेटाळून लावण्यात आली. उच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला सज्जन कुमार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. त्याने तशी याचिका सादर केली आहे. उच्च न्यायालयाने १७ डिसेंबर रोजी कुमार याला जन्मठेपेची (मरेपर्यंत तुरुंगवास) शिक्षा सुनावली होती. शिक्षेनंतर कुमारने काँग्रेसचा राजीनामा दिला होता. नैऋत्य दिल्लीमधील पालम कॉलनीमधील राजनगर-१ भागात १ आणि २ नोव्हेंबर १९८४ रोजी पाच शीखांची हत्या आणि राजनगर-२ भागात गुरुद्वारा जाळल्याप्रकरणी त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या दोन शीख सुरक्षारक्षकांनी हत्या केल्यानंतर दिल्लीमध्ये शीखविरोधी दंगल उसळली होती. सज्जन कुमार याच्यापूर्वी माजी आमदार किशन खोकर आणि महेंदर यादव यांनीही न्यायालयासमोर शरणागती पत्करली. त्यांना न्यायालयाने दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कुमारखेरीज या प्रकरणात काँग्रेसचे माजी सल्लागार बलवान खोकर, नौदलातील निवृत्त अधिकारी कॅप्टन भागमल आणि गिरधारी लाल हेदेखील दोषी ठरले आहेत.