अ‍ॅपशहर

'उत्तर प्रदेशात दलित वा ओबीसी मुख्यमंत्री द्या'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे उत्तर प्रदेशात भाजपाला स्पष्ट बहूमत मिळण्याचे संकेत मिळालेले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजप मुख्यमंत्रीपदी कोणाला बसवणार अशी चर्चा सुरू झालेली असतानाच उत्तर प्रदेशात दलित किंवा ओबीसी व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी बसवावे, अशी गुगली भाजप नेते खासदार साक्षी महाराज यांनी टाकली आहे. त्यावर भाजप काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Times 11 Mar 2017, 12:02 pm
मटा ऑनलाइन वृत्त । लखनऊ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sakshi maharaj wishes to have dalit or obc cm in uttar pradesh
'उत्तर प्रदेशात दलित वा ओबीसी मुख्यमंत्री द्या'


उत्तर प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार हे जवळपास निश्चित झालं असून तिथं मुख्यमंत्रिपदाच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. 'भाजपनं उत्तर प्रदेशात दलित किंवा ओबीसी व्यक्तीला मुख्यमंत्री करावं,' अशी गुगली भाजपचे नेते, खासदार साक्षी महाराज यांनी टाकली आहे. त्यामुळं भाजप नेमका काय निर्णय घेणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उत्तर प्रदेशात निवडणुकीला सामोरं जाताना भाजपनं मुख्यमंत्रिपदाचा कोणताही चेहरा पुढं केला नव्हता. निवडणुकीनंतर भाजपचं संसदीय मंडळ याबाबतचा निर्णय घेईल, असं भाजपकडून सांगितलं जात होतं. आता सत्ता येत असल्यामुळं भाजपला याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी अनेक नावांची चर्चा असताना खासदार साक्षी महाराज यांनी यूपीतील जातीचं गणित मांडत दलित-ओबीसी कार्ड खेळलं आहे. यूपीमध्ये २० ते २२ टक्के दलित समाज आहे. २७ टक्के मागासवर्गीय आहेत, हे लक्षात घेता पक्षानं दलित किंवा ओबीसी व्यक्तीला मुख्यमंत्री करावं,' अशी अपेक्षा साक्षींनी व्यक्त केली आहे. भाजपवर सुरुवातीपासूनच उच्चवर्णीयांचा पक्ष असा शिक्का आहे. यूपीमध्ये ब्राह्मण समाजाचंही बरंच वर्चस्व असून हा समाज भाजपचा हक्काचा मतदार समजला जातो. त्यामुळं तिथं ब्राह्मण मुख्यमंत्री होईल, असेही आडाखे बांधले जात होते. मात्र, साक्षींनी दलित, ओबीसींचा पत्ता फेकून भाजपपुढं पेच निर्माण केला आहे. अशा स्थितीत भाजप काय करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संध्याकाळपर्यंत चेहरा ठरणार!

'उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदी कुणाला बसवायचे याचा निर्णय झालेला नाही. याबाबत संध्याकाळपर्यंत निर्णय घेण्यात येईल,' अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज