अ‍ॅपशहर

यंदा स्वदेशी दिवाळी; चिनी वस्तूंना ठेंगा!

दिवाळी जवळ आल्याने आता पणत्या, कंदील, रंगीत दिव्यांच्या माळा विकत घेण्याची लगबग सर्वत्रच सुरू झाली आहे. दिवाळीच्या खरेदीत नेहमीच चिनी बनावटीच्या वस्तूंचे वर्चस्व बाजापेठेत राहिलेले आहे. यंदा मात्र बाजारपेठांमधील चिनी बनावटीच्या वस्तूंच्या खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० ते ४५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Times 9 Oct 2017, 7:10 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मंगळुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sale of chinese goods may decline by 40 45 this diwali survey
यंदा स्वदेशी दिवाळी; चिनी वस्तूंना ठेंगा!


दिवाळी जवळ आल्याने आता पणत्या, कंदील, रंगीत दिव्यांच्या माळा विकत घेण्याची लगबग सर्वत्रच सुरू झाली आहे. दिवाळीच्या खरेदीत नेहमीच चिनी बनावटीच्या वस्तूंचे वर्चस्व बाजापेठेत राहिलेले आहे. यंदा मात्र बाजारपेठांमधील चिनी बनावटीच्या वस्तूंच्या खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० ते ४५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. दी असोसिएशन ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाने केलेल्या सर्वेक्षणात ही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रंगीत दिव्यांच्या माळा, फटाके, रांगोळी अशा अनेक चिनी बनावटीच्या वस्तूंना दर दिवाळीला ग्राहकांची खास पसंती असते. परंतु, गेल्या वर्षी या वस्तूंच्या खरेदीत ३० टक्क्यांनी घट झाली होती. या वर्षी ही घट अधिक वाढण्याची शक्यता आहे.

यंदा दिवाळीसाठी बाजारपेठांतील चिनी मालाऐवजी स्वदेशी वस्तू विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल अधिक दिसत असल्याचेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. 'असोचेम'ने अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, लखनऊ आणि मुंबईतील घाऊक आणि किरकोळ व्यापारी आणि विक्रेत्यांशी चर्चा करून भारतातील चिनी बनावटीच्या वस्तूंच्या मागणीचा अंदाज घेतला.

दरम्यान, गेल्या वर्षी दिवाळीदरम्यान अंदाजे साडे सहा हजार कोटी रुपयांचा चिनी बनावटीचा माल विकला गेला होता. त्यात 'मेड इन चायना' माळा, फटाके, डेकोरशेनचं सामान, खेळणी यांसारख्या वस्तूंची सुमारे ४ हजार कोटी रुपयांची विक्री झाली होती.

चिनी मोबाइल कंपन्यांकडेही पाठ!

दिवाळीत सर्वाधिक विक्री होणाऱ्या रंगीत दिव्यांच्या माळांच्या खरेदीवर ४० ते ४५ टक्के घट दिसून येणार आहे. तसेच चिनी बनावटीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाइल फोन्स, एलसीडी टीव्ही यांच्या खरेदीत १५ ते २० टक्क्यांनी घट झाल्याची माहिती ‘असोचेम’चे सरचिटणीस डी. एस. रावत यांनी दिली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज