अ‍ॅपशहर

Salman: कैदी नं. १०६... रात्री जेवला नाही!

काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांच्या शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर काल रात्री कोठडीत पाठवण्यात आलेला बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची पहिली रात्र खूपच अस्वस्थतेत गेली. शिक्षेमुळं हादरलेल्या सलमानला काल रात्री जेवणही गेलं नाही. आलिशान लाइफस्टाइलची सवय असलेल्या सलमानला रात्र जमिनीवर झोपून काढावी लागली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Apr 2018, 10:52 am
जोधपूर: काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर काल रात्री कोठडीत पाठवण्यात आलेला बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची पहिली रात्र खूपच अस्वस्थतेत गेली. शिक्षेमुळं हादरलेल्या सलमानला काल रात्री जेवणही गेलं नाही. आलिशान लाइफस्टाइलची सवय असलेल्या सलमानला रात्र जमिनीवर झोपून काढावी लागली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम salman khan did not eat the jail food
Salman: कैदी नं. १०६... रात्री जेवला नाही!


सलमानला सध्या जोधपूर येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं आहे. कैदी म्हणून त्याला १०६ क्रमांकाचा बिल्ला मिळाला आहे. लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटक असलेला स्वयंघोषित बुवा आसाराम बापू त्याच्या शेजारच्या कोठडीत असल्याचं समजतं. सलमानला कुठलीही खास वागणूक देण्यात येणार नसल्याचं तुरुंग प्रशासनानं आधीच स्पष्ट केलं होतं. त्यानुसार, काल रात्रीच्या जेवणात त्याला इतर कैद्यांप्रमाणेच वरण-भात, कोबीची भाजी आणि चपाती दिली गेली. मात्र, त्यानं ती नाकारली. रात्री तो चार चादरी घेऊन जमिनीवर झोपला. सकाळची न्याहारीही त्याने नाकारली,' अशी माहिती कारागृह अधीक्षक विक्रम सिंह यांनी दिली.

'कोठडीत आल्यानंतर तेथील डॉक्टरांनी सलमानच्या प्रकृतीची तपासणी केली. सुरुवातीला त्याचा रक्तदाब वाढला होता. मात्र, नंतर नॉर्मल झाला,' असं विक्रम सिंह यांनी सांगितलं. 'जोधपूरच्या एका गुंडानं सलमानला मारण्याची धमकी दिली आहे. त्याच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्याला अन्य काही कैद्यांबरोबर ठेवण्याचा आमचा विचार आहे,' असंही सिंह यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज