अ‍ॅपशहर

सलमाननं 'रेप कॉमेंट'वर माफी मागितलीच नाही

बलात्काराबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगानं बजावलेल्या नोटिशीला बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं उत्तर दिलं आहे. मात्र, माफी मागितलेली नाही. 'सुलतान' चित्रपटाच्या चित्रिकरणानंतर इतका थकायचो की, बलात्कार झालेल्या महिलेसारखं वाटायचं, असं वक्तव्य सलमाननं केलं होतं.

Maharashtra Times 29 Jun 2016, 5:11 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम salman reply through his lawyer he has not apologized for his comment
सलमाननं 'रेप कॉमेंट'वर माफी मागितलीच नाही


बलात्काराबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगानं बजावलेल्या नोटिशीला बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं उत्तर दिलं आहे. मात्र, माफी मागितलेली नाही. 'सुलतान' चित्रपटाच्या चित्रिकरणानंतर इतका थकायचो की, बलात्कार झालेल्या महिलेसारखं वाटायचं, असं वक्तव्य त्यानं केलं होतं.

राष्ट्रीय महिला आयोगानं वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सलमानला नोटिस बजावून माफी मागण्यास सांगितलं होतं. त्यासाठी सात दिवसांची मुदतही दिली होती. आयोगाच्या नोटिशीला त्यानं वकिलाद्वारे उत्तर दिलं आहे. पण माफी मागितली नाही, असं आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांनी सांगितलं. त्यानं नोटिशीला दिलेल्या उत्तरावर आम्ही अभ्यास करत आहोत, असंही त्यांनी 'एएनआय'ला सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज