अ‍ॅपशहर

मराठी पाऊल पडते पुढे, राष्ट्रपतींच्या खासगी सचिवपदी पुणेकर संपदा मेहता!

आयएएस झाल्यानंतर त्यांनी जळगाव, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, पुणे या ठिकाणी विविध पदे भूषविली. मुंबईत हाफकिन इन्स्टिट्युटच्या व्यवस्थापकीय संचालकपदी तसेच, मुंबईच्या जिल्हाधिकारीपदीही त्यांनी काम केले आहे.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 12 Sep 2022, 10:31 am
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या खासगी सचिवपदी महाराष्ट्र कॅडरच्या २००८च्या तुकडीच्या सनदी अधिकारी संपदा मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती ५ वर्षांसाठी आहे. मेहता या पुण्याच्या आहेत. या नियुक्तीपूर्वी त्या केंद्रीय महसूल विभागात संचालकपदी कार्यरत होत्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम president.
राष्ट्रपतींच्या खासगी सचिवपदी संपदा मेहता


मेहता यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पुण्यातील हुजूरपागा येथे तर, महाविद्यालयीन शिक्षण सर परशुराम भाऊ महाविद्यालयात झाले. दहावी आणि बारावीत त्या पुणे विभागातून पहिल्या आल्या होत्या. २००४ मध्ये सीए झालेल्या मेहता यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून पहिला क्रमांक पटकाविला होता. तत्पूर्वी त्या गाझियाबाद येथे केंद्रीय उत्पादनशुल्क विभागात तसेच नागपूर येथे प्राप्तिकर विभागात त्या सेवारत होत्या.

आयएएस झाल्यानंतर त्यांनी जळगाव, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, पुणे या ठिकाणी विविध पदे भूषविली. मुंबईत हाफकिन इन्स्टिट्युटच्या व्यवस्थापकीय संचालकपदी तसेच, मुंबईच्या जिल्हाधिकारीपदीही त्यांनी काम केले आहे. राज्याच्या वस्तू आणि सेवाकर विभागात सहसंचालक म्हणून कार्यरत असताना त्यांची केंद्रात प्रतिनियुक्ती झाली होती.

महत्वाचे लेख