अ‍ॅपशहर

आसाममध्ये प्रथमच BJP सरकार; 'सीएम'पदी सोनोवाल

आसाममध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन झाले असून, सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, पाच राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

Maharashtra Times 24 May 2016, 6:49 pm
मटा ऑनलाइन वृत्त । गुवाहाटी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sarbananda sonowal takes oath as assam chief minister
आसाममध्ये प्रथमच BJP सरकार; 'सीएम'पदी सोनोवाल

आसाममध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन झाले असून, सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, पाच राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

आसाममध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने बहुमत मिळविले. त्यानंतर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री असलेल्या सोनोवाल यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यांची रविवारी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्री होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला होता. राज्यपाल पी. बी. आचार्या यांनी आज त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.

आसामच्या जनतेने विकासाचे स्वप्न पाहिले आणि पूर्तीसाठी सोनोवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सेवा करण्याची संधी दिली, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी जनतेचे आभार मानले. देशभरातील आदिवासी समाजाला सोनोवालांचा आजही अभिमान वाटतो, अशा शब्दांत त्यांनी सोनोवालांचे कौतुक केले. येथील जनतेला ते नेहमीच आनंद देतील आणि त्यात ते कोणतीही कसर ठेवणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज