अ‍ॅपशहर

माकडांपासून वाचवा, पंतप्रधानांना एम्सचं पत्र

देशातील सर्वात मोठ्या एम्स रूग्णालयाच्या परिसरात माकड आणि श्वानांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे केवळ रूग्णच नव्हे तर डॉक्टरांमध्येही दहशत निर्माण झाली असून या माकड आणि श्वानांच्या दहशतीतून मुक्त करण्यासाठी एम्सने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साकडे घातले आहे. तसे पत्रच त्यांनी पंतप्रधानांना लिहिले आहे.

Maharashtra Times 18 Jul 2017, 10:48 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम save aiims from monkey and dogs resident doctors wrote letter to pm modi
माकडांपासून वाचवा, पंतप्रधानांना एम्सचं पत्र

देशातील सर्वात मोठ्या एम्स रूग्णालयाच्या परिसरात माकड आणि श्वानांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे केवळ रूग्णच नव्हे तर डॉक्टरांमध्येही दहशत निर्माण झाली असून या माकड आणि श्वानांच्या दहशतीतून मुक्त करण्यासाठी एम्सने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साकडे घातले आहे. तसे पत्रच त्यांनी पंतप्रधानांना लिहिले आहे.

एम्सच्या रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर विजय कुमार यांनी मोदींना पत्र लिहिले आहे. माकडांनी रूग्णालयात दहशत निर्माण केलीच आहे. पण निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहातही उच्छाद मांडला आहे. सोमवारी तर रूग्णालयातील कॉफी शॉप परिसरात माकडांनी तीन डॉक्टरांचा चावा घेतला. त्यामुळे या माकड आणि श्वानांचा बंदोबस्त करायला हवा. तुम्ही ही समस्या सोडवाल, अशी अपेक्षा आहे, असं विजय कुमार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज