अ‍ॅपशहर

जुन्या नोटा जमा करण्याच्या तारखेत वाढ नाही

केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयाच्या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याची घातलेली मर्यादा वाढवण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. तसंच जुन्या नोटा जमा करण्याची ३० डिसेंबरची घातलेली मर्यादा वाढवावी की नाही याचा निर्णय केंद्र सरकारवर सोपवला आहे.

Maharashtra Times 16 Dec 2016, 5:55 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sc denies extending use of banned notes
जुन्या नोटा जमा करण्याच्या तारखेत वाढ नाही


केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयाच्या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याची घातलेली मर्यादा वाढवण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. तसंच जुन्या नोटा जमा करण्याची ३० डिसेंबरची घातलेली मर्यादा वाढवावी की नाही याचा निर्णय केंद्र सरकारवर सोपवला आहे. याचबरोबर नोटाबंदीच्या संबंधी असलेल्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने ५ न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे पाठवल्या.

या शिवाय नोटाबंदीच्या संबंधित प्रकरणांवर हायकोर्टात सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली आहे. तसंच नोटाबंदीशी संबंधित सहकारी बँकांना कुठलाही दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

११ ते १४ नोव्हेंबर दरम्यान जमा झालेली ८ हजार कोटीची रक्कम नव्या नोटांमध्ये बदलवण्यात येईल, असं केंद्र सरकारच्या अॅटर्नी जनरल यांनी दिलेलं आश्वासन कोर्टाने स्वीकरालं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज