अ‍ॅपशहर

सहारा-बिर्ला डायरी प्रकरणी PM मोदींना दिलासा

सहारा आणि बिर्ला डायरी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. प्रशांत भूषण यांनी दाखल केलेल्या या याचिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य नेत्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र ठोस पुरावे नसल्याचे सांगत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

Maharashtra Times 11 Jan 2017, 7:17 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sc dismisses petition filed by ngo seeking probe into the it raids on sahara and birla in which certain politicians name came up
सहारा-बिर्ला डायरी प्रकरणी PM मोदींना दिलासा

सहारा आणि बिर्ला डायरी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. प्रशांत भूषण यांनी दाखल केलेल्या या याचिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य नेत्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र ठोस पुरावे नसल्याचे सांगत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

आयकर विभागाने २०१४मध्ये सहारा आणि बिर्ला समूहाच्या कार्यालयावर टाकलेल्या छाप्यात काही डायरी सापडल्या होत्या. यात २००३मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना २५ कोटी रुपयांची लाच दिल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. याशिवाय अन्य तीन मुख्यमंत्र्यांना लाच दिल्याचे म्हटले होते. यासंदर्भात प्रशांत भूषण यांनी सादर केलेली कागदपत्रे चौकशीसाठी पुरेशी नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याच डायरीच्या आधारावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर आरोप केले होते.

न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांचा कोणताही उपयोग नाही. याचिका दाखल करणाऱ्या सीपीआयएल या संघटनेने ठोस पुरावे सादर करावेत असेही न्यायालयाने म्हटले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज