अ‍ॅपशहर

चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवाः SC

देशातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. राष्ट्रगीतावेळी चित्रपटगृहाच्या पडद्यावर राष्ट्रध्वजही दाखवला गेला पाहिजे. तसंच सर्व नागरिकांनी राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा सन्मान करावा, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

Maharashtra Times 30 Nov 2016, 12:38 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sc orders national anthem should be played in all cinema halls across the country before movie starts
चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवाः SC

देशातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. राष्ट्रगीतावेळी चित्रपटगृहाच्या पडद्यावर राष्ट्रध्वजही दाखवला गेला पाहिजे. तसंच सर्व नागरिकांनी राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा सन्मान करावा, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रगीताचा व्यावसायिक फायद्यासाठी वापर केला जाऊ नये. राष्ट्रगीत आक्षेपार्ह वस्तुंवर छापू नये, असं कोर्टाने आपल्या निर्देशात म्हटलं आहे. एका जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने हे निर्देश दिले. राष्ट्रगीत संक्षिप्त स्वरुपात वाजवू नये. ते पूर्णच वाजवावे, असं कोर्टाने बजावलं.

श्याम नारायण चौकसे यांनी कोर्टात जनहित याचिका केली होती. देशातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवले गेले पाहिजे. तसंच सरकारी समारंभ आणि कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीताबाबत योग्य नियम आणि प्रोटोकॉल निश्चित करावेत, अशी मागणी चौकसे यांनी जनहित याचिकेतून केली होती. यावर आज कोर्टात सुनावणी झाली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज