अ‍ॅपशहर

अल्पसंख्याकांसाठी प्रत्येक राज्यात सद्भावना मंडप

देशभरात धार्मिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रत्येक राज्यात सद्भावना मंडप निर्माण करण्यात येणार आहेत. ही योजना विशेष करून अल्पसंख्य समुदायांसाठी असून त्यासाठी सुमारे साडेसहा हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

Maharashtra Times 25 Aug 2016, 12:29 am
वसुधा वेणुगोपाल, ईटी वृत्त
महाराष्ट्र टाइम्स.कॉम scheme for minority
अल्पसंख्याकांसाठी प्रत्येक राज्यात सद्भावना मंडप


नवी दिल्ली : देशभरात धार्मिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रत्येक राज्यात सद्भावना मंडप निर्माण करण्यात येणार आहेत. ही योजना विशेष करून अल्पसंख्य समुदायांसाठी असून त्यासाठी सुमारे साडेसहा हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

या केंद्रांमध्ये अल्पसंख्यांकांना कौशल्यआधारित प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच तेथे समुपदेशन, तक्रार निवारण केंद्रही असेल. या समुदायातील विवाहसमारंभ तसेच अन्य महत्त्वाच्या कामांसाठी या केंद्रांचे सभागृह वापरता येणार आहे. ही योजना नवी नसून आधीच्या सरकारने ती मांडली होती. विद्यमान सरकारने तिचे ‘प्रधानमंत्री जनविकास योजना’ असे नामकरण केले असून त्या अंतर्गत हे सद्भावना मंडप सुरू करण्यात येणार आहेत. या योजनेचे कामकाज केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या देखरेखीखाली चालणार आहे.

या खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले की ही केंद्र उभारण्यासाठी संभाव्य जागांची चाचपणी करण्याची सूचना सर्व राज्यांना करण्यात आली असून राजस्थान, झारखंड व हरयाणाने त्यांच्या राज्यांतील जागा निश्चित केल्या आहेत. यासाठी एकूण साडेसहा हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या योजनेत आतापर्यंत राज्यांवर अधिक जबाबदारी होती. परंतु यापुढे ती केंद्राच्या अखत्यारीत चालवली जाईल.

काश्मीरमध्ये रोजगार

काश्मीरमध्ये लेह, जम्मू आणि कारगिल येथे स्थानिक तरुणांसाठी रोजगारभिमुख प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे काश्मीरमधील तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल, असा विश्वास नक्वी यांनी व्यक्त केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज