अ‍ॅपशहर

srinagar encounter : श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश; चकमकीत दोन दहशतवादी ठार

श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आलं आहे. काश्मीर दहशतवादी अतिशय सक्रिय झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाच्या जवानांनीही कारवाई सुरू केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Nov 2021, 11:55 pm
श्रीनगरः जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये हैदरपुरा भागात सुरक्षादलांना मोठं यश मिळालं. सुरक्षा दलांच्या जवानांनी चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. सोमवारी संध्याकाळी साडे सहा वाजता ही चकमक सुरू झाली होती. या चकमकीनंतरही सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. चकमक सुरू होताच काही वेळात पहिला दहशतवादी मारलला गेला. त्यानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दुसरा दहशतवादीही ठार झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम security forces have eliminated two unidentified terrorists in an encounter in hyderpora area of srinagar
श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश; चकमकीत दोन दहशतवादी ठार


चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्यानंतरही सुरक्षा दलांची कारवाई सुरूच आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं होतं. या वर्षी सुरक्षा दलाच्या जवानांनी आतापर्यंत १३० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. काश्मीरच्या खोऱ्यात अजूनही ३८ विदेशी दहशतवादी आहेत. एकूण १५० ते २०० दहशतवादी सक्रिय असल्याचं सांगण्यात येतंय.

गुजरातमध्ये ATS ची मोठी कारवाई; ६०० कोटींचे १२० किलो हेरॉइन पकडले, तीन जणांना अटक

जम्मू-काश्मीरमध्ये अलिकडच्या काळात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. ८ नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी एका गोळ्या घालून एका सेल्समनची हत्या केली होती. त्यापूर्वी ७ नोव्हेंबरला एका पोलीस कॉन्स्टेबलची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात दहशतवाद्यांनी १३ नागरिकांची हत्या केली होती.

महत्वाचे लेख