अ‍ॅपशहर

राधे माँ थेट पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ पुन्हा एकदा वादात अडकली आहे. राधे माँने विवेक विहारमधील पोलीस ठाण्यात 'प्रकट' झाली. इतकंच नाही तर राधे माँने थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसली. इतकंच नाही तर या पोलीस ठाण्याचा अधिकारी संजय शर्मा राधे माँ समोर हात जोडून उभा राहिला.

Maharashtra Times 5 Oct 2017, 12:51 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम self styled god woman radhe ma welcomed at vivek vihar police station
राधे माँ थेट पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर


स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ पुन्हा एकदा वादात अडकली आहे. राधे माँने विवेक विहारमधील पोलीस ठाण्यात 'प्रकट' झाली. इतकंच नाही तर राधे माँने थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसली. इतकंच नाही तर या पोलीस ठाण्याचा अधिकारी संजय शर्मा राधे माँ समोर हात जोडून उभा राहिला.

राधे माँच्या भक्तित लीन झालेल्या या अधिकाऱ्याचा फोटो वायरल झाल्याने पोलीस दलावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. राधे माँसाठी दाखवलेल्या 'भक्तिभावा'चे वर्तन चुकीचे असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी विशेष पोलीस आयुक्त दिपेंद्र पाठक यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस अधिकारी संजय शर्मा यापूर्वीही लाचखोरीच्या आरोपावरून चर्चेत राहिलेला आहे. आता राधे माँला थेट आपल्या खुर्चीवर बसवून तिच्याबद्दल भक्तिभाव दाखवणेही त्याच्या अंगलट आले असून नोकरीवर गदा येऊ शकते.


Self styled god woman Radhe Ma welcomed at Vivek Vihar police station in Delhi, sat on chair of SHO pic.twitter.com/0hbkTLpr5K — ANI (@ANI) October 5, 2017

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज