अ‍ॅपशहर

सेल्फीच्या नादात तरुणाला लागला गळफास

आपला 'खास' सेल्फी घेण्यासाठी एका तरुणाने आत्महत्या करण्याचा 'ड्रामा' केला आणि तो अंगलट आल्याने त्याला थेट हॉस्पिटमध्येच दाखल व्हावे लागले. ही घटना कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील हेबरीमधील कब्बिनले येथे घडली. सेल्फी काढण्यासाठी या तरुणाने आपल्या गळ्यात फास टाकला. मात्र पायाखालचा स्टूल अचानक सरकला आणि त्याच्या गळ्याभोवतीच हा फास आवळला गेला.

Maharashtra Times 22 Apr 2017, 5:25 pm
मटा ऑनलाईन वृत्त, हेबरी (कर्नाटक)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम selfie love becomes suicidal takes boy in hospital
सेल्फीच्या नादात तरुणाला लागला गळफास


आपला 'खास' सेल्फी घेण्यासाठी एका तरुणाने आत्महत्या करण्याचा 'ड्रामा' केला आणि तो अंगलट आल्याने त्याला थेट हॉस्पिटमध्येच दाखल व्हावे लागले. ही घटना कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील हेबरीमधील कब्बिनले येथे घडली. सेल्फी काढण्यासाठी या तरुणाने आपल्या गळ्यात फास टाकला. त्याच्या सोबत त्याचे मित्र देखील होते. मात्र सेल्फी काढता काढता पायाखालचा स्टूल अचानक सरकला आणि त्याच्या गळ्याभोवतीच हा फास आवळला गेला.

सेल्फीच्या नादात भलतेच घडल्याचे लक्षात येताच त्याच्या मित्रांनी तातडीने या तरुणाच्या आईवडिलांना बोलावले. त्यांतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

स्थानिक व्यापारी दामोदल नाइक यांनी या तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात मदत केली. या व्यापाऱ्याने या तरुणाच्या मित्रांसह तरुणाला आपल्या कारमध्ये नेले. तातडीने या व्यापाऱ्याने मदत केली नसती तर काहीही घडू शकले असते. व्यापाऱ्याच्या मदतीमुळे या तरुणाचे प्राण वाचले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज