अ‍ॅपशहर

ज्येष्ठ पत्रकाराची आईसह हत्या

ज्येष्ठ पत्रकार के. जे. सिंग (६४) आणि त्यांची आई गुरचरण कौर (९२) यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सिंग यांच्या मोहालीतील घरातच दोघांचे मृतदेह सापडले.

Maharashtra Times 24 Sep 2017, 12:52 am
नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार के. जे. सिंग (६४) आणि त्यांची आई गुरचरण कौर (९२) यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सिंग यांच्या मोहालीतील घरातच दोघांचे मृतदेह सापडले. सिंग यांची गळा चिरून, तर त्यांच्या आईची गळा आवळून हत्या करण्यात आली. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम senior journalist kj singh mother murdered in mohali
ज्येष्ठ पत्रकाराची आईसह हत्या


सिंग हे पूर्वी इंडियन एक्स्प्रेसमध्ये वृत्तसंपादक होते. ट्रिब्यून आणि टाइम्स ऑफ इंडिया, चंदिगढ येथेही त्यांनी काम केले होते. पंजाब, हरयाणा व चंदिगढमधील पत्रकारांनी या दुहेरी हत्येचा तीव्र निषेध करताना तातडीने या प्रकरणी तपास करण्याची मागणी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज