अ‍ॅपशहर

अंदमान हत्याप्रकरणी सात जणांना अटक

अंदमान आणि निकोबार बेटसमूहातील उत्तर सेंटिनेल बेटावरील संरक्षित आदिवासी जमातीतील लोकांनी अमेरिकी नागरिकाची हत्या केल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली. अमेरिकी वकिलातीने मात्र हा नागरिक बेपत्ता असल्याचे म्हटले आहे. अमेरिकी नागरिकाला या बेटावर घेऊन जाणाऱ्या मच्छिमारासह...

Maharashtra Times 22 Nov 2018, 1:26 am
नवी दिल्ली : अंदमान आणि निकोबार बेटसमूहातील उत्तर सेंटिनेल बेटावरील संरक्षित आदिवासी जमातीतील लोकांनी अमेरिकी नागरिकाची हत्या केल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली. अमेरिकी वकिलातीने मात्र हा नागरिक बेपत्ता असल्याचे म्हटले आहे. अमेरिकी नागरिकाला या बेटावर घेऊन जाणाऱ्या मच्छिमारासह एकूण सात जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम seven accused arrested in andaman murder
अंदमान हत्याप्रकरणी सात जणांना अटक


जोन अॅलेन छाऊ (वय २७) असे अमेरिकी नागरिकाचे नाव आहे. छाऊ याने यापूर्वी अंदमान आणि निकोबारला पाच वेळा भेट दिली होती. सेंटिनेल येथील आदिवासींना भेटण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती. अंदमान शिखा या स्थानिक प्रसारमाध्यमानुसार, सेंटिनल आदिवासी ही नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली आदिम जमात आहे. त्यांची संख्या भारतीय जनगणनेप्रमाणे ४० आहे. बाहेरील कुठल्याही व्यक्तींबरोबर संपर्क प्रस्थापित होऊ न देण्यासाठी ही जमात प्रसिद्ध आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज