अ‍ॅपशहर

आरबीआय गव्हर्नरपद: स्पर्धेत सात नावं चर्तेत

भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपल्या पदाची दुसरी टर्म स्वीकारण्यास नकार दिला आहे. राजन यांनी जाहीर केलेल्या भूमिकेनंतर आता आरबीआच्या नव्या प्रमुखाचा शोध सुरू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरबीआयच्या गव्हर्नरपदासाठी सरकारकडे सात नावांची यादी तयार असून यांपैकी एकाची गव्हर्नरपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Times 19 Jun 2016, 6:37 pm
मटा ऑनलाइन वृत्त। नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम seven names on long list to replace raghuram rajan as rbi governor official
आरबीआय गव्हर्नरपद: स्पर्धेत सात नावं चर्तेत

भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपल्या पदाची दुसरी टर्म स्वीकारण्यास नकार दिला आहे. राजन यांनी जाहीर केलेल्या भूमिकेनंतर आता आरबीआच्या नव्या प्रमुखाचा शोध सुरू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरबीआयच्या गव्हर्नरपदासाठी सरकारकडे सात नावांची यादी तयार असून यांपैकी एकाची गव्हर्नरपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चर्चेतील सात नावे

आरबीआयच्या गव्हर्नरपदासाठी सध्या विजय केळकर, राकेश मोहन, अशोक लाहिरी, उर्जित पटेल, अरुंधती भट्टाचार्य, सुबीर गोकर्ण आणि अशोक चावला या सात नावांची चर्चा आहे. उर्जित पटेल हे आरबीआयचे डेप्यूटी गव्हर्नर आहेत, तर अरुंधती भट्टाचार्य देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या प्रमुख आहेत.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार या सात पैकी दोन नावं सर्वात जास्त चर्चेत आहेत. या दोन नावांमध्ये डेप्यूटी गव्हर्नर उर्जित पटेल आणि एसबीआयच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांचा समावेश आहे.

या चर्चेमध्ये अर्थखात्यातील अधिकारी शक्तीकांत दास आणि अरविंद सुब्रमण्यम यांच्या नावाची देखील चर्चा होती. मात्र नंतर ते स्पर्धेच्या बाहेर फेकले गेल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या दुसऱ्या टर्मबाबत कायम चर्चेत राहणाऱ्या रघुराम राजन यांनी शनिवारी आरबीआय कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात आपण पुन्हा गव्हर्नरपद स्वीकारणार नसल्यातं सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

नोबेल पुरस्कार विजेता अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी राजन यांच्या या निर्णयाबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. दरम्यान, रघुराम राजन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ते शैक्षणिक कार्याकडे वळणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज