अ‍ॅपशहर

'मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांचे पूर्वज हे सनातनी हिंदू', शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांच्या दाव्याने खळबळ

Puri Shankaracharya Swami Nischalananda Saraswati : शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी प्रेषित मुहम्मद आणि येशू ख्रिस्त यांच्या पूर्वजांसंबंधी मोठं विधान केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी अमेरिकी संसदेचाही उल्लेख केला आहे. ते काय म्हणाले? वाचा सविस्तर....

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Feb 2023, 3:50 pm
Shankaracharya Swami Nischalananda : पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रेषित मुहम्मद (Prophet Muhammad)आणि येशू ख्रिस्त (Jesus Christ)यांचे पूर्वज हे सनातनी हिंदू (Sanatani Hindu) असल्याचं सिद्ध झालं आहे, असा दावा शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी केला आहे. भुवनेश्वरमध्ये असताना ते म्हणाले की, 'अमेरिकेतील विरोधी पक्षांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला आहे. प्रेषित मुहम्मद आणि येशू ख्रिस्त यांचे पूर्वज हे सनातनी हिंदू असल्याचं सिद्ध झालं आहे.'
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Shankaracharya Swami Nishchalananda


शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती हे पुढे म्हणाले की, 'मंदिरं आणि मठांवर सरकारचं नियंत्रण असणं चुकीचं आहे. प्रत्येक जागेच्या विकासासाठी पैसा खर्च करणं ही सरकारची गरज आहे.' पुरीच्या रत्न भंडाराच्या हरवलेल्या चावीसंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, ओडिसा सरकार आणि जगन्नाथ मंदिर प्रशासनाने यावर कधीही चर्चा केली नाही. त्यामुळे या चावी हरवल्या प्रकरणी मी काही बोलू शकत नाही.

३८ वर्षांआधी हरवली होती चावी...

मंदिराच्या आवारात तब्बल ७ खजिने आहेत. जे नेहमी उघडे असतात. तब्बल ३८ वर्षांआधी चार खजिन्यांच्या चाव्या हरवल्या होत्या. परंतू जिल्हाधिकाऱ्यांकडे यातील फक्त दोन चाव्या आहेत. याआधीही शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी जोशीमठातील घरांना भेगा पडणे, निसर्गाचा अपमान करणे आणि विकासाच्या मुद्द्यावर आवाज उठवला होता.

"पृथ्वी आणि पर्यावरण शुद्ध ठेवणे आपलं काम..."

दरम्यान, उत्तराखंडमध्ये असलेल्या जोशीमठात (Joshimth) अनेक दुकाने, रस्ते आणि इमारतींना तडा जात असल्याचं समोर येत आहे. वारंवार जमिनी खचत असल्यामुळे या परिसराला 'सिंकिंग झोन' घोषित करण्यात आला आहे. या सगळ्यावर शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती (Shankaracharya Swami Nischalananda)म्हणाले की, 'पृथ्वी, जल आणि वायू हे उर्जेचे स्त्रोत आहेत. त्यामुळे पृथ्वी आणि पर्यावरणाचं रक्षण करणं हे आपलं काम आहे'
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज