अ‍ॅपशहर

सोनिया गांधी-शरद पवार यांच्यात ५० मिनिटं चर्चा

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष ज्या बैठकीकडे लागले होते ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची बैठक संपली असून या दोन्ही नेत्यांनी सुमारे ५० मिनिटं चर्चा झाली. या बैठकीत नेमकं काय ठरलं, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Nov 2019, 6:26 pm
नवी दिल्ली : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष ज्या बैठकीकडे लागले होते ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीतील बैठक संपली असून या दोन्ही नेत्यांची सुमारे ५० मिनिटं चर्चा झाली. या बैठकीत नेमकं काय ठरलं, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sharad-pawar


सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर शरद पवार माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता '६ जनपथ' या आपल्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यामागोमाग तिथे राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातील विधिमंडळ पक्षनेते अजित पवारही पोहचले आहेत. शरद पवार पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देतील, असेही सांगण्यात येत आहे.

सरकार स्थापनेचं शिवसेना, भाजपला विचारा: शरद पवार

सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर आपल्या निवासस्थानी परतलेल्या शरद पवार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी संपर्क साधल्याचे वृत्त असून पवारांनी राऊत यांना आपल्या घरी बोलावून घेतल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. थोड्याच वेळात संजय राऊत पवार यांच्या निवासस्थानी जाणार असून ते पत्रकार परिषदेत सहभागी होतात का, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

शिवसेना 'एनडीए'तून बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार दिल्लीत दाखल होतील व सोनिया गांधी यांच्याशी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर विस्तृतपणे चर्चा करतील असे सांगण्यात आले होते. त्यानुसार पवार व सोनिया यांची नियोजित बैठक आज पार पडली. सोनियांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांनी सुमारे ५० मिनिटं चर्चा केली. महाराष्ट्रातील सत्ताकोंडी फोडण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी ही बैठक असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत राज्यात सत्तास्थापन करणार का, याचा फैसला या बैठकीनंतर जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसने भाजपसोबत जावे: कुमारस्वामी

असं आहे पक्षीय बलाबल

भाजप- १०५
शिवसेना - ५६
राष्ट्रवादी काँग्रेस- ५४
काँग्रेस- ४४
बहुजन विकास आघाडी- ३
एमआयएम- २
समाजवादी पार्टी- २
प्रहार जनशक्ती पार्टी- २
माकप- १
जनसुराज्य शक्ती- १
क्रांतिकारी शेतकरी पार्टी- १
महाराष्ट्र नवनिर्माण सेना- १
राष्ट्रीय समाज पक्ष- १
स्वाभिमानी पक्ष- १
शेकाप - १
अपक्ष- १३
एकूण जागा- २८८

भाजपनं राष्ट्रवादीकडून शिकावं; मोदींचा सल्ला

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज