अ‍ॅपशहर

संजय राऊतांनी सांगितला आयुर्वेदिक अंडी व कोंबडीचा किस्सा

भारतात काही ठिकाणी आयुर्वेदिक अंडी आणि कोंबडी असल्याचा दाखला राज्यसभेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. या शाकाहारी अंडी आणि कोंबडीला शाकाहारी की मांसाहारी आहे, हेदेखील आयुषने प्रमाणित करण्याची मागणी राऊत यांनी केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jul 2019, 11:18 pm
नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanjay-raut-in-Rajyasabha


भारतात काही ठिकाणी आयुर्वेदिक अंडी आणि कोंबडी असल्याचा दाखला राज्यसभेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. या शाकाहारी अंडी आणि कोंबडीला शाकाहारी की मांसाहारी आहे, हेदेखील आयुषने प्रमाणित करण्याची मागणी राऊत यांनी केली.

राज्यसभेत आज आयुष मंत्रालयाशी निगडीत मुद्यांवर चर्चा झाली. यामध्ये आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी यांना प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा झाली. त्यावेळी संजय राऊत यांनी आयुर्वेदिक कोंबडी आणि अंडी यांचा किस्सा सभागृहाला ऐकवला. नंदुरबारमधील एका आदिवासी पाड्यावर भेट दिली असताना तेथील स्थानिकांनी त्यांना कोंबडीचे जेवण दिले. कोंबडी खाण्यास राऊत यांनी नकार दिला. त्यावेळी स्थानिकांनी त्यांना ही आयुर्वेदिक कोंबडी असल्याचा दाखला दिला. ही कोंबडी खाल्ल्यास रोगांपासून मुक्तता होत असल्याचा दावा स्थानिकांनी केला होता असेही राऊत यांनी सांगितले. तर, चौधरी चरण सिंह विद्यापीठातील काही संशोधकांनी त्यांना आपण आयुर्वेदिक अंड्यांवर संशोधन करत असल्याचे सांगितले. आयुर्वेदिक अंड देणाऱ्या कोंबडीला फक्त वनस्पती, आयुर्वेदिक खाद्य दिले जाते. त्यामुळे त्या कोंबडीपासून बनणारे अंडे हे पूर्णपणे शाकाहारी असून शाकाहारी व्यक्तीदेखील प्रोटीनसाठी अंड खाऊ शकत असल्याचा दावा त्यांनी केला असल्याचे संजय राऊत यांनी केला.

कोणती अंडी व कोंबडी शाकाहारी आणि मांसाहारी आहेत यासाठी निकष ठरवण्यात यावे अशी मागणीही राऊत यांनी केली. देशात शाकाहारी आणि मांसाहारी हा वाद जुना आहे. त्यामुळे आयुष मंत्रालयाची जवाबदारी मोठी असल्याचेही त्यांनी सांगितले. जगभरात योग आणि आयुर्वेद प्रचार १५०० कोटी नव्हे तर १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी राऊत यांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज