अ‍ॅपशहर

‘मध्य प्रदेशची धुरा शिवराज यांच्याकडेच’

पुढील वर्षी मध्य प्रदेशामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे नेतृत्व मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडेच असेल, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी स्पष्ट केले. शहा यांच्या या घोषणेमुळे मध्य प्रदेशातील खांदेपालटाविषयीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Maharashtra Times 20 Aug 2017, 2:18 am
भोपाळ ः पुढील वर्षी मध्य प्रदेशामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे नेतृत्व मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडेच असेल, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी स्पष्ट केले. शहा यांच्या या घोषणेमुळे मध्य प्रदेशातील खांदेपालटाविषयीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivraj to lead bjp in 2018 election amit shah
‘मध्य प्रदेशची धुरा शिवराज यांच्याकडेच’


चौहान सध्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा तिसरा कार्यकाळ पूर्ण करीत आहेत. पुढील वर्षीची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल, असे शहा यांनी प्रसारमाध्यम संपादकांसोबत आयोजित केलेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये सांगितले. मागील काही आठवड्यांपासून चौहान यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करण्यात येणार असून त्यांच्याकडे महत्त्वाचे पद सोपवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. चौहान यांनी मात्र या शक्यतांचा इन्कार केला होता. या सर्व अफवा असून मी राज्यातच भाजपला चौथ्यांदा विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले होते. भाजपचे मध्य प्रदेशातील प्रदेशाध्यक्ष नंदकुमारसिंह चौहान यांना कार्यकाळ वाढवून मिळेल का, याविषयी मात्र शहा यांनी मौन बाळगले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज