अ‍ॅपशहर

३६ तासांपूर्वीच प्राध्यापक झाला दहशतवादी

शोपियांमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झालेला काश्मीर विद्यापीठातील प्राध्यापक मोहम्मद रफी बट अवघ्या ३६ तासांत दहशतवादी झाल्याचं उघडकीस आलं आहे. दहशतवादी होण्यापूर्वी तो काही दिवस गायबही झाला होता, अशी माहितीही समोर आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 May 2018, 3:59 pm
श्रीनगर: शोपियांमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झालेला काश्मीर विद्यापीठातील प्राध्यापक मोहम्मद रफी बट अवघ्या ३६ तासांत दहशतवादी झाल्याचं उघडकीस आलं आहे. दहशतवादी होण्यापूर्वी तो काही दिवस गायबही झाला होता, अशी माहितीही समोर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shopian kashmir university professor involved in terrorism also stack in encounter
३६ तासांपूर्वीच प्राध्यापक झाला दहशतवादी


मोहम्मद रफी बट ३६ तासांपूर्वीच दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. शुक्रवारपासून दहशतवाद्यांशी सुरक्षा दलाची चकमक सुरू होती. या चकमकीत तोही दहशतवाद्यांबरोबर सामिल झाला आणि अखेर जवानांच्या गोळीचा बळी ठरला. बट सेंट्रल काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील चुंडुना गावचा रहिवासी आहे. काश्मीर विद्यापीठात तो समाजशास्त्र शिकवत होता. असिस्टंट प्राध्यापक म्हणून तो कार्यरत होता. तो शुक्रवारी दुपारी ३.३० वाजल्यापासून बेपत्ता झाला होता. त्याच दिवशी त्याने त्याच्या आईशी शेवटचा संवाद साधला होता. मात्र भविष्यातील योजनांबाबत त्याने आईला काहीच सांगितलं नव्हतं. विद्यापीठानेही तो बेपत्ता असल्याचं शनिवारी स्पष्ट केलं होतं. त्याला शोधण्यात यावं म्हणून शनिवारी विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलं होतं. त्यामुळे कुलगुरुंनीही पोलीस महासंचालकांना पत्र लिहून बटला शोधण्याची विनंती केली होती.

दरम्यान, आज शोपियांमध्ये पाच अतिरेकी लपून बसल्याची खबर मिळाल्यावर सुरक्षा दलाच्या जवानांनी सर्च ऑपरेशन केले असता जवान आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली. त्यात बटही ठार झाला. दरम्यान, बटने शरणागती पत्करावी म्हणून त्याच्या कुटुंबीयांना चकमकीच्या ठिकाणी आणण्यात आले. त्याच्या कुटुंबीयांनीही त्याला शरणागती पत्करण्यास सांगितले. मात्र तो बधला नाही. त्यामुळे जवानांनी त्याला कंठस्नान घातले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज