अ‍ॅपशहर

'रामाप्रमाणेच तिहेरी तलाक आस्थेचा मुद्दा'

काँग्रेस नेते आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे वकील कपिल सिब्बल यांनी भगवान राम आणि तिहेरी तलाकची तुलना करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. तिहेरी तलाक हा भगवान रामाप्रमाणेच आस्थेचा मुद्दा असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टात केला.

Maharashtra Times 16 May 2017, 2:40 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sibal says in sc triple talaq is going on since 1400 years
'रामाप्रमाणेच तिहेरी तलाक आस्थेचा मुद्दा'

काँग्रेस नेते आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे वकील कपिल सिब्बल यांनी भगवान राम आणि तिहेरी तलाकची तुलना करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. तिहेरी तलाक हा भगवान रामाप्रमाणेच आस्थेचा मुद्दा असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टात केला.

'भगवान राम यांचा अयोध्येत जन्म झाल्याची जशी हिंदूंची आस्था आहे तशीच आस्था मुस्लिमांची तिहेरी तलाकबद्दल आहे. रामावरील हिंदूंच्या आस्थेवर शंका घेता येत नाही तर मग तिहेरी तलाकवर सवाल का?' तसंच तीन तलाक अमान्य झाल्यास नवीन कायदा करण्याच्या केंद्र सरकारच्या वक्तव्यावरूनही सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केले.

'मुस्लिम धर्मात १४०० वर्षापासून तिहेरी तलाकचे पालन होत आहे आणि हा विश्वासाचा मुद्दा आहे. यामुळे तिहेरी तलाक घटनाबाह्य आहे असे कसे म्हणता येईल? जर भगवान राम यांचा जन्म अयोध्येत झाला होता ही हिंदूंची आस्था घटनेला मान्य आहे तर मग तिहेरी तलाकची मुस्लिमांची आस्थाही मान्यच केली पाहिजे', असं सिब्बल म्हणाले. निकाह आणि तलाक हे एकमेकांशी जुळलेले आहेत तर दुसऱ्यांना हे खूपण्याचे कारण काय?, असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज