अ‍ॅपशहर

...म्हणून शिक्षकांनी मुलींचे कपडे काढले!

शाळेच्या गणवेशाचे पैसे दिले नाहीत म्हणून शिक्षकांनी भर शाळेत विद्यार्थिनींनी घातलेले कपडे काढण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील वीरपूर गावात घडली आहे. पीडित विद्यार्थिनी या सख्ख्या बहिणी असून या गरीब घरातील आहेत.

Maharashtra Times 18 Jun 2017, 1:35 pm
मटा ऑनलाइन वृत्त । बेगुसराय (बिहार)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sisters stripped allegedly by bihar school after father fails to pay fee
...म्हणून शिक्षकांनी मुलींचे कपडे काढले!


शाळेच्या गणवेशाचे पैसे दिले नाहीत म्हणून शिक्षकांनी भर शाळेत विद्यार्थिनींनी घातलेले कपडे काढण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील वीरपूर गावात घडली आहे. पीडित विद्यार्थिनी या सख्ख्या बहिणी असून या गरीब घरातील आहेत. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शिक्षिका अंजनाकुमारी आणि शाळा संचालक एन. के. झा यांना शुक्रवारी रात्री अटक केली.

पीडित मुलींचे वडील शुक्रवारी दुपारी एक वाजता मुलींना शाळेत आणायला गेले होते. त्यावेळी त्यांच्या लहान मुलीने शिक्षिका अंजना कुमारी यांनी तुम्हाला भेटायला बोलावल्याचा निरोप दिला. भेट झाल्यानंतर अंजनाकुमारी हिनं मुलींच्या गणवेशाचे पैसे देण्याचा तगादाच लावला. जूनपर्यंत पैसे देतो असं मुलींच्या वडिलांनी सांगूनही त्यांनी ऐकले नाही आणि मुलींच्या अंगावर असेलेले कपडे तिथंच काढले. मुलींचे वडील संचालकांकडे दाद मागण्यासाठी गेले असता त्यांनीही मुलींना अर्धवट कपड्यांत घरी घेऊन जाण्यास सांगितले, अशी माहिती मुलींच्या वडिलांनी दिली.

बिहारचे शिक्षणमंत्री अशोक चौधरी यांनी या घटनेचा निषेध केला असून प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे. मुलींनी या घटनेचा धसका घेतला आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज