अ‍ॅपशहर

काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती पूर्वपदावर

सुमारे दोन महिन्यांपासून धुमसत असणाऱ्या काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीमध्ये सुधारणा होत असून, पुलवामा शहरातील संचारबंदी मंगळवारी मागे घेण्यात आली. अन्य भागामध्ये परिस्थिती सुरळीत होत असून, फक्त श्रीनगर शहरातील दोन पोलिस ठाण्यांच्या क्षेत्रामध्ये संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.

Maharashtra Times 31 Aug 2016, 2:13 am
वृत्तसंस्था, श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम situation in kashmir back to normal
काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती पूर्वपदावर


सुमारे दोन महिन्यांपासून धुमसत असणाऱ्या काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीमध्ये सुधारणा होत असून, पुलवामा शहरातील संचारबंदी मंगळवारी मागे घेण्यात आली. अन्य भागामध्ये परिस्थिती सुरळीत होत असून, फक्त श्रीनगर शहरातील दोन पोलिस ठाण्यांच्या क्षेत्रामध्ये संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.

‘हिज्बुल मुजाहिदीन’चा दहशतवादी बुऱ्हान वानी सुरक्षा दलांबरोबरील चकमकीमध्ये मारला गेल्यापासून, काश्मीर खोऱ्यामध्ये हिंसाचार सुरू आहे. गेले ५३ दिवस हिंसाचार सुरू होता आणि यामध्ये सातत्याने सुरक्षा दलांवर हल्ले होत होते. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत ६८ जणांचा मृत्यू झाला असून, शेकडो जण जखमी झाले आहेत. परिस्थितीमध्ये सुधारणा होत असताना, टप्प्याटप्प्याने बहुतांश भागातील संचारबंदी मागे घेण्यात आली आहे. पुलवामा शहरातील परिस्थिती सुधारल्यामुळे सोमवारनंतर मागे घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता फक्त श्रीनगरमधील नौहट्टा आणि एम. आर. गुंज या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. दगडफेकीच्या काही किरकोळ घटना वगळता, खोऱ्यामध्ये शांतता असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, फुटीरतावाद्यांकडून काश्मीरमधील तणाव कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरूच असून, एक सप्टेंबर रोजी त्यांनी ‘बंद’चे आवाहन केले आहे. त्यामुळे खोऱ्यामध्ये विशेषत: संवेदनशील ठिकाणांच्या परिसरातील बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.

काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती पूर्वपदार येत असताना, श्रीनगरमध्ये सोमवारपासून खासगी वाहने आणि ऑटो रिक्षांची वर्दळ दिसू लागली आहे. प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या लाल चौक परिसरामध्ये हीच परिस्थिती होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज