अ‍ॅपशहर

यूपीत फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, ६ ठार

उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात सहाजण ठार झाले आहेत. तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबच्या बटाला येथेही एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला होता. त्यात २३ कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Sep 2019, 4:49 pm
एटा: उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात सहाजण ठार झाले आहेत. तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबच्या बटाला येथेही एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला होता. त्यात २३ कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम blast


एटा जिल्ह्यातील मिरेहची येथे ही घटना घडली. दुपारी अचानक या कारखान्यात अचानक स्फोट झाला. स्फोट अत्यंत भीषण होता. स्फोटानंतर संपूर्ण कारखानाच जमीनदोस्त झाला. त्यामुळे या परिसरात एकच धावपळ उडाली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. ढिगारा हटविण्याचे काम वेगाने सुरू असून या ढिगाऱ्यातून आतापर्यंत ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज