अ‍ॅपशहर

भयंकर! कोट्यवधींच्या मालकिणीची ही अवस्था, घरात आढळला सांगाडा, ६ महिन्यांपासून कोणाला दिसलीच नव्हती महिला

A woman's skeleton was found : आग्रा येथे १५ वर्षांपासून एकाकी आयुष्य जगणाऱ्या एका कोट्यधीश महिलेचा सांगाडा तिच्या घरात सापडला आहे. आग्राच्या उत्तर विजय नगर कॉलनीतील ही घटना आहे.

Authored byसुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Feb 2023, 4:14 pm

हायलाइट्स:

  • आईच्या मृत्यूनंतर ६५ वर्षीय महिला एकटीच राहत होती.
  • १५ वर्षे कोणीही सोबत नव्हते, ऑगस्टपासून महिलेस कोणीही पाहिले नाही.
  • बंगल्याचे कुलूप तोडल्यानंतर दिसला सांगाडा, मृत्यूची वेळही स्पष्ट नाही.
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम skeleton of a woman was found
बंगल्यात आढळला महिलेचा सांगाडा
आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका बंगल्यात महिलेचा सांगाडा सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा सांगाडा एका ६५ वर्षीय महिलेचा आहे. ही महिला या घरात सुमारे १५ वर्षांपासून एकटीच राहत होती. सुमारे पाच महिन्यांपासून तिला कुणीही बाहेर पाहिलेले नव्हते. जेव्हा घराचे दार उघडले गेले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. कारण या घरात फक्त मृतदेहाचा सांगाडा आढळला.पोलिसांनी हा सांगाडा जप्त केला.
निर्मलदेवी असं या महिलेचे नाव आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर ही महिला तिच्या आईसोबत राहू लागली. मात्र, वर्षांपूर्वी तिच्या आईचेही निधन झाले. यानंतर ती ५०० चौरस यार्डच्या बंगल्यात एकटीच राहत होती. अधूनमधून ती किराणा सामान घेण्यासाठी बाहेर जात असे. ऑगस्ट २०२२ पासून कोणीही या महिलेला बाहेर पडताना पाहिले नाही. शेजाऱ्यांनी देखील बराच काळ या महिलेचा वावर पाहिलेला नाही. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी तिच्या बंगल्याचे कुलूप तोडले असता महिलेचा सांगाडा सापडला. मृतदेहाच्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता. महिला घरात मृत्यू पावली आहे याबाबत कोणालाही माहिती नव्हती. आता या महिलेच्या मृत्यूचे गूढ शवविच्छेदनानंतरच कळणार आहे.

मुलाचा अकाली मृत्यू, स्वप्न अधुरे राहिले, ते पूर्ण करण्यासाठी मजुराने सुरू केला अनोखा उपक्रम, होतंय कौतुक
आग्रा येथील नॉर्थ विजय कॉलनी येथे राहणारी ही महिला अविवाहित होती. तिचे वडील गोपाल सिंह यांचा फाउंड्री नगर येथे खतांचा कारखाना होता. वडिलांचे दुसरे लग्न झाले होते. ही महिला सिंह यांच्या दुसऱ्या पत्नीचे अपत्य होते. पहिल्या पत्नीची मुलं गाझियाबाद येथे राहत होते.

ज्या बंगल्यात ही महिला राहत होती, त्या बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. पोलिसांनी निर्मलदेवींचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. निर्मलदेवींचा मृत्यू दोन महिन्यांपूर्वी झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, निर्मलादेवींना आम्ही गेल्या ६ महिन्यांपासून पाहिलेले नाही, असे शेजारी सांगतात.

पोटच्या मुलाशी बाप इतका निर्दयी कसा वागू शकतो?, बापाच्या धक्कादायक कृत्याने संपूर्ण अंबरनाथ हादरले
निर्मलदेवी यांचे सावत्र भाऊ-बहिणींशी पटत नव्हते. त्यामुळे त्या त्यांच्यापासून दूरच राहत होत्या. निर्मलदेवी यांनी दयालबाग विद्यापीठातून पीएचडी देखील केली आहे. मात्र त्यांनी लग्न केले नाही. त्या शाळेत शिकवण्याचे काम करत होत्या. २० वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर १५ वर्षांपूर्वी त्यांच्या आईचेही निधन झाले. त्यानंतर त्या एकट्याच राहत होत्या.

आधी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले, मग केला वारंवार अत्याचार, मारहाण करून पैसेही उकळत राहिला, नाशकात खळबळ
बंगल्याला होते कुलुप

निर्मलदेवी यांचे बंधू रणवीर सिंह हे दीड महिन्यापूर्वी निर्मलादेवी यांच्या घरी आले होते. मात्र त्यांनी बंगल्याला कुलुप पाहिले. त्यांनी दारही ठोठावले, मात्र त्यांना काहीही उत्तर आले नाही. त्यानंतर ते निघून गेले असे रणवीर सिंह यांनी सांगितले.
लेखकाबद्दल
सुनील तांबे
सुनील तांबे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सी न्यूज, ईटीव्ही मराठी वृत्तवाहिनी या वाहिन्यांमध्ये प्रतिनीधी आणि वरिष्ठ प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे, तसेच मुंबई सकाळ या वृत्तपत्रात मंत्रालय प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. त्याच प्रमाणे आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीत असोसिएट एडिटर म्हणून आणि मी मराठी या वृत्त वाहिनीत असोसिएट एडिटर म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांनी युवर स्टोरी या डिजिटल मीडियात वरिष्ठ कंटेट प्रोड्युसर म्हणूनही काम पाहिले आहे. सुनील तांबे हे २०१५ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये आजतागायत कार्यरत आहेत. सुनील तांबे यांना इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि डिजिटल मीडियात गेल्या २३ वर्षांपासून कार्यरत आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख