अ‍ॅपशहर

देशहितासाठी नव्हे, कुटुंबासाठी देशाची फाळणीः स्मृती ईराणी

इंग्रजांनी भारताचे विभाजन केले. त्यालाच काँग्रेसने आपले आदर्श बनवले. काँग्रेस पक्षाने देशाची फाळणी करण्याला सहमती दर्शवली कारण काँग्रेसला त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला पंतप्रधान व्हायचे होते, देशाची फाळणी ही देश हितासाठी नव्हे तर कुटुंबासाठी करण्यात आली होती, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2020, 6:49 pm

खालापूरजवळ अपघातात शबाना आझमी गंभीर जखमी

नवी दिल्लीः इंग्रजांनी भारताचे विभाजन केले. त्यालाच काँग्रेसने आपले आदर्श बनवले. काँग्रेस पक्षाने देशाची फाळणी करण्याला सहमती दर्शवली कारण काँग्रेसला त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला पंतप्रधान व्हायचे होते, देशाची फाळणी ही देश हितासाठी नव्हे तर कुटुंबासाठी करण्यात आली होती, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम smriti irani


केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी या आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदार संघ वाराणसी दौऱ्यावर आल्या होत्या. नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत स्मृती ईराणी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, १९ जानेवारी १९९० ला पाकिस्तानच्या इशाऱ्यावर जम्मू-काश्मीरमधील पंडिताना काढण्याचे काम करण्यात आले. तो दिवस इतिहासातील काळा दिवस होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बापूच्या आवाजाला स्वीकारले. भारतातील जनतेने जगाला जे वचन दिले होते. ते वचन पूर्ण करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे, असे स्मृती ईराणी यावेळी म्हणाल्या. उत्तर प्रदेशातील वाराणसीत नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) च्या समर्थनार्थ आयोजित सभेत स्मृती ईराणी यांनी काँग्रेसवर शरसंधान साधले. नागरिकत्व संशोधन कायद्यासाठी जनतेने आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदारांना आशीर्वाद दिले आहे.

पाकिस्तान आणि काँग्रेसवर टीका करताना स्मृती ईराणी म्हणाल्या, पाकिस्तानात ज्यावेळी मुलींवर बलात्कार झाला, त्यांचे जबरदस्तीने लग्न करण्यात आले त्यावेळी काँग्रेसने ब्र शब्द बाहेर काढला नाही. पाकिस्तानात ईसाईंच्या धार्मिक स्थळावर बॉम्बस्फोट करण्यात आले. त्यावेळी सोनिया गांधी यांना रडू आले नाही. परंतु, बाटला हाऊस कांडावर मात्र त्यांना अश्रू अनावर झाले, अशी टीकाही स्मृती ईराणी यांनी केली. मुलीच्या हक्कासाठी नरेंद्र मोदी यांनी जो कायदा आणला आहे. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते, असे स्मृती ईराणी म्हणाल्या.



'मग राहुल गांधींना अंदमानात पाठवावं लागेल'

सात वर्षानंतर आले 'गोल्ड ईटीएफ' अच्छे दिन!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज