अ‍ॅपशहर

श्रीदेवी यांच्या अस्थिंचं गंगेत विसर्जन

बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार, अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अस्थिंचं गुरुवारी पती बोनी कपूर यांच्या हस्ते हरिद्वारमध्ये गंगेत विसर्जन करण्यात आलं. यावेळी अभिनेते अनिल कपूर आणि मनीष मल्होत्रा उपस्थित होते. यापूर्वी ४ मार्च रोजी रामेश्वरमध्येही त्यांच्या अस्थिंचं विसर्जन करण्यात आलं होतं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Mar 2018, 10:52 am
नवी दिल्ली: बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार, अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अस्थिंचं गुरुवारी पती बोनी कपूर यांच्या हस्ते हरिद्वारमध्ये गंगेत विसर्जन करण्यात आलं. यावेळी अभिनेते अनिल कपूर आणि मनीष मल्होत्रा उपस्थित होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sridevis ashes immersed in haridwar by boney kapoor anil kapoor and manish malhotra
श्रीदेवी यांच्या अस्थिंचं गंगेत विसर्जन


श्रीदेवी यांच्या अस्थी दोन कलशांमध्ये मुंबईहून हरिद्वारमध्ये आणण्यात आल्या होत्या. पूजापाठ केल्यानंतर त्यांच्या अस्थिंचं गंगा नदीत विसर्जन करण्यात आलं. यापूर्वी ४ मार्च रोजी रामेश्वरमध्येही त्यांच्या अस्थिंचं विसर्जन करण्यात आलं होतं. गेल्या महिन्यात २४ फेब्रुवारी रोजी श्रीदेवी यांचं दुबईत निधन झालं होतं. आधी त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगण्यात येतं होतं. मात्र शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज